4 जीबी रॅम, 4050एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह 10,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Lenovo K10 Plus

Lenovo ने गेल्या आठवड्यात शॉपिंग साइट फ्लिपकार्ट द्वारे सांगितले होते कि कंपनी भारतात आपली ‘के सीरीज’ वाढवत नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे नाव Lenovo K10 Plus सांगितले होते जो फक्त आनलाईन प्लॅटफॉर्म वरच विकला जाईल. आता कंपनीने Lenovo K10 Plus अधिकृतपणे इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 10,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या 30 सप्टेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

Lenovo K10 Plus डिजाईन

फोनच्या लुक आणि डिजाईन बद्दल बोलायचे तर Lenovo K10 Plus बेजल लेस डिस्प्ले वर बनलेला आहे ज्यावर ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. डिस्प्लेच्या दोन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. Lenovo K10 Plus ट्रिपल रियर कॅमेरा वर लॉन्च केला जाईल जो बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे तसेच पॅनलच्या मध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. वाल्यूम रॉकर आणि पावर बटण फोनच्या उजव्या पॅनल वर आहे.

Lenovo K10 Plus स्पेसिफिकेशन्स

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.22 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने या डिस्प्लेना डॉट नॉच डिस्प्ले असे नाव दिले आहे. Lenovo K10 Plus एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह 14एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 506 जीपीयू आहे.

Lenovo K10 Plus कंपनीने 4 जीबी रॅम सह लॉन्च केला तसेच फोन मध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Lenovo K10 Plus ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 13 MP चा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबत 8 MP आणि 5 MP चा डेफ्थ सेंसर आणि 120डिग्री वाइड अँगल लेंस असेल. तसेच सेल्फी साठी हा फोन 16 MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Lenovo K10 Plus डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Lenovo K10 Plus मध्ये 4,050एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी क्विक चार्ज टेक्नॉलॉजी सह येते. Lenovo K10 Plus येत्या 30 सप्टेंबर पासून फ्लिपकार्ट वर 10,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here