6जीबी रॅम आणि 6.2-इंचाच्या नॉच स्क्रीन सह लॉन्च झाला लेनोवो झेड5

अनेक दिवस चर्चेत राहिल्यानंतर लेनोवो चा नवीन स्मार्टफोन झेड5 आज अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च झाला आहे. लेनोवो ने आपला हा लेटेस्ट स्मार्टफोन चीनी बाजारात लॉन्च केला आहे. शानदार व स्टाईलिश लुक सह दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला लेनोवो झेड5 कपंनी द्वारा दोन वेरिएंट्स मध्ये सादर करण्यात आला आहे जो आगामी काही दिवसांमध्ये चीन च्या बाहेर अन्य देशांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

लेनोवो झेड5 मेटालिक फ्रेम वर बनला आहे ज्याचा बॅक पॅनल ग्लास चा आहे. कंपनी ने झेड5 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस ​डिस्प्ले सह सादर केला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. फोन मध्ये 2246 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.2-इंचाची मोठी फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे तसेच फोन चे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल 2.5डी कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहेत.

लेनोवो झेड5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन झेडयूआई 4.0 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 14एनएम आॅक्टा-कोर प्रोसेसर आहे त्याचबरोबर हा क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. झेड5 कंपनी द्वारा 6जीबी रॅम मेमरी सह सादर करण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 509 जीपीयू आहे.

हा फोन लेनोवो ने 64जीबी तसेच 128जीबी च्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता झेड5 मध्ये डुअल रियर कॅमेरा आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सल आणि 8-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे ज्यात एआई टेक्निक आहे. लेनोवो झेड5 च्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो.

लेनोवो झेड5 डुअल सिम फोन आहे तसेच पावर बॅकअप साठी या यात 3,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीनी बाजारात हा फोन ब्लॅक, ब्लू आणि आॅरा कलर वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. किंमत पाहता हा फोन 1,299 युआन च्या सुरवाती किंमतीत लॉन्च झाला आहे जी भारतीय करंसी नुसार जवळपास 13,500 रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here