मीडियाटेक डिमेन्सिटी 700 प्रोसेसरसह OPPO A78 5G ची भारतात एंट्री; जाणून घ्या किंमत

गेले कित्येक दिवस बातम्या येत होत्या की ओप्पो लवकरच भारतीय बाजारात ए78 5जी स्मार्टफोन सादर करणार आहे. त्यानुसार आज हा फोन लाँच करण्यात आला आहे. कंपनी भारतात OPPO A78 5G स्मार्टफोन सादर केला आहे. या फोनमध्ये कमी बजेटमध्ये मीडियाटेक डिमेन्सिटी 700 प्रोसेसर, 50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जींग असे दमदार स्पेक्स मिळतात. चला जाणून घेऊया OPPO A78 5G ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती.

OPPO A78 5G ची किंमत

OPPO A78 5G स्मार्टफोनचा एकच मॉडेल भारतीय बाजारात दाखल झाला आहे. ज्यात 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या मॉडेलची किंमत कंपनीनं 18,999 रुपये ठेवली आहे, किंमतीबाबत अधिकृत माहिती कंपनीनं दिली नाही परंतु ही माहिती ऑफलाइन स्टोरच्या माध्यमातून मिळाली आहे. सध्या हा फोन प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहे आणि याची विक्री 18 जानेवारीपासून सुरु होईल. हे देखील वाचा: ‘या’ दिवशी येतंय सरकारी कंपनीचं 4G नेटवर्क; BSNL नं सांगितली लाँच डेट

OPPO A78 5G चे स्पेसिफिकेशन

  • 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले
  • 5,000 एमएएच बॅटरी, 33 वॉट चार्जर
  • 50 एमपी ड्युअल कॅमेरा, 8 एमपी सेल्फी कॅमेरा
  • अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टम
  • 8 जीबी रॅम प्लस, 128 जीबी मेमरी

OPPO A78 5G चे फुल स्पेसिफिकेशन पाहता या फोनमध्ये तुम्हाला 6.5 इंचाचा मोठा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीनं यात पंच होल स्क्रीनचा वापर केला येऊ जी खूप बेजलसह आली आहे. हा डिस्प्ले 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर कंपनीनं ओप्पो ग्लो डिजाईनचा वापर केला आहे, त्यामुळे याची डिजाईन आकर्षक वाटते.

हा फोन बॉडी ग्लास फिनिशसह येतो पॅनलवर ट्रिपल कॅमेरा मिळेल. फोनची जाडी फक्त 7.99 एमएम आहे आणि वजन 188 ग्राम आहे. फोनच्या रियर पॅनलवर एक लांब स्ट्रीप आहे जिच्या वरच्या बाजूला रिंग स्टाइलमध्ये कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी सेन्सर आहे आणि जोडीला 2MP चा सेकंडरी कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या ओप्पो फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हा 5जी फोन मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसर वर चालतो आणि यात तुम्हाला 8 जीबी रॅमसह 8 जीबी रॅम प्लसची सुविधा मिळते. म्हणजे एकूण 16 जीबी रॅमचा वापर तुम्ही करू शकता. तसेच यात कंपनीनं 128GB इंटरनल स्टोरेज देखील दिली आहे, जी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते. हा फोन अँड्रॉइड 13 वर चालतो ज्यावर कलर ओएस 13 ची लेयरिंग मिळेल. हे देखील वाचा: 200MP च्या सर्वात मोठ्या कॅमेऱ्यासह Samsung फोन येतोय; Galaxy Unpacked इव्हेंटची अधिकृत घोषणा

पावर बॅकअपसाठी OPPO A78 5G स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सिक्योरिटीसाठी कंपनीनं साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे, तसेच हा फोन फेस अनलॉकला देखील सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G, 5G, वायफाय 5, ब्लूटूथ 5.3, यूएसबी टाइप-सी पोर्ट, हेडफोन जॅक आणि जीपीएस सारखे ऑप्शन मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here