अनलिमिटेड डेटासह Airtel आणले दोन स्वस्त प्लॅन, किंमत 199 रुपयांपासून सुरु

Highlights

  • एयरटेलनं आपल्या ब्रॉडबँड युजरसाठी दोन स्वस्त प्लॅन्स सादर केले आहेत.
  • एयरटेल ब्रॉडबँड सर्व्हिस Airtel Xstream Fiber युजर्ससाठी आले दोन प्लॅन.
  • कंपनीनं हे दोन्ही Broadband Standby Plans नावानं आणले आहेत.

एयरटेलनं आता आपल्या ब्रॉडबँड ग्राहकांना खुश करत दोन नवीन प्लॅन्स सादर केले आहेत. या दोन्ही प्लॅनची किंमत अनुक्रमे 199 रुपये व 399 रुपये आहे. तसेच हे प्लॅन्स Airtel Xstream Fiber युजर्ससाठी आणले आहेत. टेलिकॉम कंपनीनं हे प्लॅन Broadband Standby Plans नविन सादर केले आहेत. पुढे आम्ही तुम्हाला या प्लॅन्ससह मिळणाऱ्या सर्व बेनिफिट्सची माहिती दिली आहे.

एयरटेल 199 ब्रॉडबँड स्टॅन्डबाय प्लॅनमध्ये मिळणारे बेनिफिट्स

  • 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये 10Mbps च्या स्पीडसह अनलिमिटेड डेटा ऑफर केला जात आहे.
  • ग्राहकांना हे एंट्री लेव्हल प्लॅन 5 महिन्यासाठी घ्यावे लागतील. त्यामुळे युजर्सना एकूण 1174 रुपये (जीएसटीसह) द्यावे लागतील.
  • तसेच 500 रुपये वन टाइम इंस्टॉलेशन चार्ज आणि जीएसटी देखील द्यावा लागेल.
  • हा प्लॅन खरेदी करणाऱ्या युजर्सना कंपनी फ्री राउटर देखील देईल.
  • हे देखील वाचा: जियोनं लाँच केला JioDive VR Headset; 100-इंचाच्या स्क्रीनवर दिसेल IPL

    एयरटेल 399 ब्रॉडबँड स्टॅन्डबाय प्लॅनमध्ये मिळणार बेनिफिट्स

  • 399 रुपयांच्या या एयरटेल ब्रॉडबँड प्लॅनसह देखील 10Mbps च्या स्पीडसह अनलिमिटेड डेटा ऑफर केला जात आहे.
  • प्लॅनमध्ये एक्स्ट्रीम बॉक्स, फ्री वाय फाय राउटर आणि 350 पेक्षा जास्त टीव्ही चॅनेल्स मिळतील.
  • प्लॅन पण कमीत कमी 5 महिन्यासाठी घ्यावा लागेल.
  • वन टाइम इंस्टॉलेशन चार्ज आणि जीएसटी नंतर हा प्लॅन तुम्हाला 3 हजार रुपयांना पडेल.
  • हे देखील वाचा: 11 मेला भारतात येत आहे Google Pixel 7A, फ्लिपकार्टवरून होईल विक्री

  • दोन्ही प्लॅनमध्ये कॉलिंग मिळेल फ्री
  • ब्रॉडबँड स्टॅन्डबाय प्लॅन घेणाऱ्या एयरटेल एक्स्ट्रीम फायबर युजर्सना कंपनी डेटा व्यतिरिक्त अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. इतकेच नव्हे तर युजर्स कधीही आपल्या प्लॅनमध्ये मिळणारा स्पीड अपग्रेड देखील करू शकतात, म्हणजे तुम्ही कधीही तुमचा प्लॅन अपग्रेड करू शकता.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here