29 मार्चला भारतात येतोय Moto G13; मिळणार 5,000एमएएचची बॅटरी आणि 50एमपी कॅमेरा

Highlights

  • मोटो जी13 भारतात 29 मार्चला लाँच केला जाईल.
  • फोनमध्ये 50एमपी रियर कॅमेरा आणि 5,000एमएएचची बॅटरी असेल.
  • स्मार्टफोन सेलसाठी ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल.

91मोबाइल्सनं अलीकडेच एक्सक्लूसिव्ह माहिती दिली होती की मोटोरोला लवकरच बजेट सेगमेंटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन Moto G13 4G भारतात सादर करणार आहे. तसेच, आता याची इंडिया लाँच डेट कन्फर्म झाली आहे. फ्लिपकार्टच्या लँडिंग पेजच्या माध्यमातून समजलं आहे की कंपनी 29 मार्चला दुपारी 12 वाजता या हँडसेटची किंमत आणि सर्व फीचर्स जगासमोर ठेवेल. तसेच ई-कॉमर्स साइटवरून फोनचे काही स्पेसिफिकेशन्स देखील ऑफिशियल करण्यात आले आहेत, ज्यात 5,000एमएएचची बॅटरी आणि 50एमपीच्या कॅमेऱ्याचा समावेश आहे.

Moto G13 ची किंमत (लीक)

विशेष म्हणजे यावर्षी जानेवारीमध्ये Moto G23 सह मोटो जी13 ग्लोबली लाँच करण्यात आला आहे. अलीकडेच आलेल्या रिपोर्ट्सनुसार, भारतात Moto G13 ची किंमत 12,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. हे देखील वाचा: 28,999 रुपयांमध्ये येऊ शकतो 6GB RAM असलेला Samsung Galaxy A34 5G फोन, आमच्या हाती लागली माहिती

Moto G13 चे स्पेसिफिकेशन्स

फ्लिपकार्ट लिस्टिंगमधून स्पष्ट झालं आहे की Motorola च्या Moto G13 मध्ये पंच-होल पॅनल आणि ट्रिपल-कॅमेरा सिस्टम मिळेल. तसेच फोनमध्ये 720 x 1600 पिक्सल आणि एचडी+ रेजोल्यूशनसह 6.5 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिली जाईल. यात 90Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर स्क्रीन वर पांडा ग्लास प्रोटेक्शन मिळू शकते.

मोटोरोलाच्या या फोनमध्ये MediaTek Helio G85 चिपसेट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेज असेल, हे कन्फर्म आहे. तसेच फोनमध्ये 10W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी मिळू शकते. इतकेच नव्हे तर मध्ये फोनमध्ये मागे 50MP ची मेन लेन्स आणि फ्रंटला 8MP चा कॅमेरा असल्याचं देखील समजलं आहे. कमी किंमतीत येणारा हा फोन Android 13 आधारित MyUX सह चालेल. हे देखील वाचा: 6,000mAh च्या राक्षसी बॅटरीसह Samsung Galaxy F14 5G ची एंट्री; किंमत 12,990 रुपये

कनेक्टिव्हिटी ऑप्शन म्हणून फोनमध्ये 4जी वीओएलटीई, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि एनएफसीचा समावेश केला जाऊ शकतो. तसेच सुरक्षेसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here