13,999 रुपयांमध्ये 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा Moto G42 फोन लाँच

मोटोरोला यंदा भारतीय बाजारात आधीपेक्षा जास्त सक्रिय झाली आहे. कंपनीचे स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन रेडमी-रियलमी सारख्या ब्रँड्सची झोप उडवत आहे. आता जागतिक बाजारात लाँच झालेला Moto G42 स्मार्टफोन भारतात आला आहे. भारतीय चाहते या हँडसेटची आतुरतेने वाट बघत होते. Moto G42 स्मार्टफोन AMOLED डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर, 50MP कॅमेरा सेटअप आणि 5000mAh च्या बॅटरीसह भारतीयांच्या भेटीला आला आहे. तसेच फोनमध्ये IP52 रेटिंग, 20W TurboPower चार्जिंग, आणि स्टीरियो स्पिकर सेटअप असे फीचर्स देखील मिळतात.

मोटोरोलाचा हा नवीन स्मार्टफोन भारतात ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart च्या माध्यमातून विकला जाईल. मोटोरोलाच्या Moto G-सीरीजमधील हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे, ज्याची लिस्टिंग लाँचपूर्वीच फ्लिपकार्टवर करण्यात आली होती. इथे आम्ही तुम्हाला लेटेस्ट Moto G42 स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतीची माहिती देत आहोत.

Moto G42 ची किंमत

Moto G42 स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट भारतीयांच्या सेवेत दाखल झाला आहे, ज्यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळते. ये एकमेव व्हेरिएंटची किंमत कंपनीनं 13,999 रुपये ठेवली आहे. हा नवीन स्मार्टफोन ईकॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. Moto G42 स्मार्टफोनचा पहिला सेल 11 जुलैला आयोजित करण्यात आला आहे. या सेलमध्ये SBI क्रेडिट कार्ड धारकांना 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तसेच मोटोरोलाच्या या फोनवर जियो युजर्सना 2549 रुपयांचे बिनिफिट्स मिळतील.

Moto G42 स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स

  • 6.4-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले
  • Android 12 आधारित My UX युआय
  • Qualcomm Snapdragon 680 SoC
  • 64GB स्टोरेज
  • 50MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 16MP सेल्फी कॅमेरा
  • 5,000mAh बॅटरी, 20W फास्ट चार्जिंग
  • IP52 रेटिंग

मोटोरोलाच्या Moto G-सीरीजच्या लेटेस्ट स्मार्टफोन Moto G42 मध्ये 6.5-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो Full HD+ रिजोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह बाजारत आला आहे. कंपनीनं डिस्प्लेसाठी सेंटर पंच डिजाईनचा वापर केला आहे, मध्यभागी आलेल्या कटआउटमध्ये सेल्फी कॅमेरा मिळतो. मोटो जी42 स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा कोर Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे, सोबत ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU मिळतो.

मोटोरोलाचा हा फोन Android 12 वर चालतो. कंपनी या हँडसेटचा Android 13 चा अपडेट आणि तीन वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. Moto G42 स्मार्टफोन IP52 रेटिंग सह येतो. तसेच मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये स्टीरियो स्पिकर सेटअप देण्यात आला आहे जो Dolby Atmos ऑडियोला सपोर्ट करतो. हा फोन अटलांटिक ग्रीन आणि मेटॅलिक रोज कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल.

मोटोरोलाच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा शूटर देण्यात आला आहे. फोनमध्ये प्रायमरी कॅमेऱ्यासह 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. मोटोरोलाच्या या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात टाईप सी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. Moto G42 स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 20W टर्बोपावर फास्ट चार्जिंगसह मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here