अॅप्पल आयफोन 9 मध्ये असेल डुअल सिम सपोर्ट, अॅप्पल कोड वरून झाला खुलासा

अॅप्पल दरवर्षी आपल्या नवीन जेनरेशनचे आयफोन घेऊन येते जे टेक्नोलॉजीच नवीन रूप घेऊन येतात. विभिन्न ब्रांड्सच्या एंडरॉयड स्मार्टफोंस मध्ये आयफोन ने आपली ओळख कायम ठेवली आहे. आपल्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त अॅप्पल ने आयफोन एक्स सह नॉच डिस्प्ले पहिल्यांदाच टेक विश्‍वा समोर सादर केला होता, जो आजकाल जवळपास सर्वच स्मार्टफोन कंपन्या वापरत आहेत. पण आता एक अशी टेक्नोलॉजी आहे जी अॅप्पल कंपनी एंडरॉयड कडून घेणार आहे. ही टेक्नोलॉजी म्हणजे डुअल सिम सपोर्ट. बातमी अशी आहे की आता अॅप्पल पण आपल्या नवीन आयफोन्सना डुअल ​सिम सपोर्ट सह बाजारत आणेल.

9टू5मॅक ने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला आहे की आता नवीन आयफोन पण डुअल सिम सपोर्ट सह येतील म्हणजे नवीन आयफोन मध्ये पण 2 सिम कार्ड वापरता येतील. विशेष म्हणजे अॅप्पल ने आता पर्यंत आपल्या सर्व आयफोन मध्ये एकच एक्सट्रनल स्लॉट दिला आहे. या स्लॉट मध्ये फक्त एक सिम टाकता येत होते. एक स्लॉट मुळे आयफोन ची मेमरी एक्सपांड करता येत नाही तसेच डुअल सिम पण वापरता येत नाही. पण आता असे वाटते आहे की लवकरच आगामी आयफोन्स मध्ये हा मोठा बदल दिसू शकतो.

आयफोन संबधी या मोठ्या बातमी सोबत वेबसाइट ने एक स्क्रीन शॉट पण शेयर केला आहे. हा स्क्रीन शॉट आयओएस 12 च्या बीटा 5 डेवलेपर वर्जन चा आहे. रिपोर्ट नुसार अॅप्पल च्या आॅपरेटिंग सिस्टम आयओएस च्या आगामी वर्जन मध्ये कंपनी डुअल सिम सपोर्ट ची टेस्टिंग करत आहे. आयओएस 12 च्या या वर्जन मध्ये सिम स्टेटस ची कोडिंग करण्यात आली आहे. या कोडिंग मध्ये ‘सिम स्टेटस’ आहेच सोबत ‘सेकेंड सिम स्टेटस’ ​पण लिहिण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ‘सिम ट्रे स्टेटस’ आणि ‘सेकेंड सिम ट्रे स्टेटस’ पण आहे.

रिपोर्ट नुसार सिम स्टेटस पहिल्या सिम बद्दल माहिती देतो तर सेकेंड सिम स्टेटस दुसर्‍या सिम चा कोड असेल असे बोलले जात आहे. ही कोडिंग सध्या सिम आयओएस 12 च्या बीटा 5 डेवलेपर वर्जन मध्ये दाखवण्यात आली आहे. म्हणजे अॅप्पल आता पासूनच अशा सॉफ्टवेयर ची निर्मिती करत आहे ज्यामुळे आयफोन मध्ये पण दोन सिम वापरता येतील. रिपोर्ट नुसार आयओएस मध्ये डुअल सिम सपोर्ट यूजर्सना सिम कार्ड न बदलता कॅरियर प्लान्स स्वीच करण्याची सुविधा देईल.

चर्चा अशी आहे की अॅप्पल यावर्षी लॉन्च होणार्‍या आयफोन मध्ये डुअल सिम कार्ड सपोर्ट देऊ शकते. रिपोर्ट नुसार डुअल सिम कार्ड सपोर्ट कंपनी च्या महाग आयफोन वेरिएंट मध्ये दिला जाईल. दुसरीकडे दोन सिम कार्ड स्लॉट आल्यानंतर यूजर्सना आशा आहे की अॅप्पल कंपनी लवकरच आपल्या आयफोन मध्ये एक्सटर्नल स्टोरेज सपोर्ट द्यायला सुरवात करेल. पण अजूनही आयफोन मधील दोन सिम कार्ड च्या या बातमी वर विश्वास ठेवता येणार नाही जोवर कंपनी स्वतः याची घोषणा करत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here