लॉन्चच्या आधीच समोर आले Nokia 1.3 चे स्पेसिफिकेशन्स, 23 फेब्रुवारीला होऊ शकतो लॉन्च

Nokia येत्या 23 फेब्रुवारीला मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस MWC 2020 मध्येसहभाग घेणार आहे. कंपनी या मोठ्या मंचावरून आपले नवीन स्मार्टफोन्स आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी सादर करेल. कंपनीने अजूनतरी लॉन्च केल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्सची नावे सांगितली नाहीत पण असे बोलले जात आहे कि 23 फेब्रुवारीला कंपनी Nokia 8.2 4G, Nokia 5.2, Nokia 1.3 आणि Nokia 400 4जी फीचर फोन सादर करू शकते. या स्मार्टफोन्सबद्दल आतापर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत आणि आता लॉन्चच्या आधीच Nokia 1.3 च्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

Nokia 1.3 चे स्पेसिफिकेशन्स नोकिया पावर यूजरने शेयर केले आहेत. विशेष म्हणजे नोकिया 1.3 कंपनीचा एंट्री लेवल स्मार्टफोन असेल जो लो बजेट मध्ये लॉन्च केला जाईल. एनपीयू नुसार Nokia 1.3 स्मार्टफोन लुक आणि डिजाईनच्या बाबतीत काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या Nokia 2.3 सारखा असेल. या वेबसाइटने फोनचे स्पेसिफिकेशन्स शेयर करण्यासोबतच सांगतिले आहे कि हा डिवाईस चारकोल आणि स्यान कलर मध्ये बाजारात येईल. एक नजर टाकूया समोर आलेल्या नोकिया 1.3 च्या स्पेसिफिकेशन्स वर.

Nokia 1.3

नोकिया 1.3 गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या नोकिया 1 प्लस चा अपग्रेडेड वर्जन असेल. नोकिया पावर यूजरच्या रिपोर्ट वर विश्वास ठेवल्यास Nokia 1.3 कंपनी 6 इंचाच्या मोठ्या डिस्प्ले वर लॉन्च करू शकते. वेबसाइटनुसार हा स्मार्टफोन एंडरॉयडच्या लेटेस्ट वर्जन वर लॉन्च होईल तसेच प्रोसेसिंगसाठी या मोबाईल मध्ये मीडियाटेकचा चिपसेट दिला जाईल. तसेच Nokia 1.3 मध्ये 1 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे पण समोर आले आहे.

Nokia 1.3 बद्दल सांगण्यात आले आहे कि हा स्मार्टफोन माइक्रोएसडी कार्डला पण सपोर्ट करेल. तसेच एनपीयू च्या मते Nokia 1.3 सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल जो 8 मेगापिक्सलचा असेल. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. या स्मार्टफोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4000एमएएच ची बॅटरी असल्याचे सांगण्यात आले आहे. तरीही फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमतसाठी 23 फेब्रुवारीची वाट बघितली जात आहे.

Nokia 2.3

नोकिया 2.3 पाहता भारतात हा फोन 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च झाला आहे ज्याची किंमत 8,199 रुपये आहे. Nokia 2.3 Cyan Green, Sand आणि Charcoal कलर ऑप्शन मध्ये विकत घेता येईल. या फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता नोकियाच्या या बजेट स्मार्टफोन मध्ये 6.2 इंचाचा एचडी+ (720×1520 पिक्सल) इन-सेल डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 19:9 आहे.

Nokia 2.3 एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च झाला आहे तसेच फोन मध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी क्वॉड-कोर मीडियाटेक हीलियो ए22 प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी Nokia 2.3 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर, अपर्चर एफ/2.2 आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तर पावर बॅकअपसाठी Nokia 2.3 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here