
Nokia 105 4G 2023 मॉडेल चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. क्लासिक कँडीबार डिजाइनसह आला हा फोन नवीन नाही. तर गेल्यावर्षी कंपनीनं हा हँडसेट सादर केला होता. परंतु, यावेळी फोन मोठ्या बॅटरी कपॅसिटीसह सादर करण्यात आला आहे. त्यामुळे फोनची बॅटरी लाइफ आधीपेक्षा जास्त मिळेल. चला जाणून घेऊया या फोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती.
नोकिया 105 4जीची किंमत
नोकिया 105 4जी फोन Alipay सपोर्टसह चीनी मार्केटमध्ये आला आहे. हा फोन चीनमध्ये 229 युआन (जवळपास 2,700 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. परंतु, लाँच ऑफर अंतगर्त हँडसेट 199 युआन (2,350 रुपये) मध्ये प्री-ऑर्डर केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: व्हिडीओ बघताना फोनमध्ये झालेल्या स्फोटामुळे केरळातील आठ वर्षांच्या मुलीचा मृत्य
नोकिया 105 4जी चे स्पेसिफिकेशन्स
- 1.8-Inch QQVGA Color Display
- 1450mAh Battery
- 32GB Storage
- UNISOC T107
Nokia 105 4G मध्ये 1.8-इंचाचा QQVGA कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन 4G VoLTE सपोर्टसह येतो. जुन्या Nokia 105 4G च्या तुलनेत नवीन व्हर्जनमध्ये 1450mAh ची बॅटरी मिळते. या फोन मध्ये 32GB स्टोरेज एक्सपांशन, ब्लूटूथ 5.0, 3.5mm ऑडियो जॅक आणि microUSB 2.0 पोर्ट देण्यात आला आहे. Nokia 105 4G फीचर फोनमध्ये Unisoc T107 चिप आणि 128MB रॅम आहे. तसेच फोनमध्ये आता बोल्ड बटन फॉन्ट देण्यात आले आहेत आणि हा ब्लॅक आणि ब्लु रंगात उपलब्ध आहे.

बॅटरीमधील बदल वगळता नवीन फोन क्लासिक कँडी बार डिजाइन आणि बटन सोबतच येतो. हा वयस्कर युजर्स, विद्यार्थी आणि बॅकअप फोनची आवश्यकता असणाऱ्या लोकांसाठी एक चांगला ऑप्शन बनू शकतो. Nokia 105 4G मध्ये खास फिचर आहे ज्यामुळे राइट-क्लिक करून किंवा पेमेंट मेनूच्या माध्यमातून अलीपे वापरता येतं. नंतर पेमेंट क्यूआर कोड किंवा बारकोड स्कॅन करण्यासाठी “पेमेंट कोड” वर क्लिक करता येईल. हे देखील वाचा: OPPO Reno 10 Pro+ स्मार्टफोन 100W फास्ट चार्जिंगसह 3C सर्टिफिकेशनवर लिस्ट; अशी असतील वैशिष्ट्ये
भारतात येईल का नोकिया 105 4G 2023 फोन?
सध्या भारतात या फोनच्या लाँच बद्दल कंपनीनं कोणतीही माहिती दिली नाही. परंतु, आम्हाला आशा आहे की फोन भारतात येऊ शकतो. सध्या भारतात Nokia 105 4G फोन 1,020mAh बॅटरीसह आहे. तसेच या फोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स नोकिया 105 4G 2023 हँडसेट सारखेच आहेत.














