5G फोन Nokia 8.3 सह आले Nokia 5.3, Nokia 1.3 आणि Nokia 5310, जाणून घ्या यांचे दमदार फीचर्स

Nokia ब्रँडचे स्मार्टफोन बनवणारी कंपनी HMD Global ने गुरुवारी एका इवेंटचे आयोजन करून आपले तीन नवीन स्मार्टफोन्स सादर केले आहेत. नोकियाने या इवेंट मध्ये 5G स्मार्टफोन Nokia 8.3 सह अजून तीन फोन लॉन्च केले आहेत. हे स्मार्टफोन Nokia 5.3, Nokia 1.3 आणि XpressMusic Nokia 5310 आहेत. Nokia 1.3 एक बजेट स्मार्टफोन आहे, जो Android Go सह सादर केला गेला आहे.

भारतात लवकरच होतील लॉन्च

ग्लोबल लॉन्च सोबतच Nokia 5.3 आणि Nokia 5310 नोकिया इंडिया वेबसाइट वर स्पेसिफिकेशन्स सह लिस्ट झाले आहेत. या लिस्टिंग मध्ये विक्रीची तारीख आणि किंमतीची माहिती समोर आलेली नाही. पण आशा आहे कि कंपनी लवकरच या दोन्ही फोन्सच्या किंमतींचा आणि विक्री संबंधित खुलासा करेल.

किंमत आणि विक्री डिटेल

किंमतीबद्दल बोलायचे तर Nokia 5.3 स्मार्टफोन कंपनीने 3 स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनच्या फक्त 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटच्य किंमतीची घोषणा केली गेली आहे. Nokia 5.3 च्या या मॉडेलची किंमत 189 यूरो (जवळपास 15,000 रुपये) आहे. तर Nokia 1.3 ची किंमत 95 यूरो (जवळपास 7,600 रुपये) आहे. नोकियाचे हे दोन्ही स्मार्टफोन एप्रिल मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील. नोकिया 5.3 स्मार्टफोन साइऐन, सँड आणि चारकोल कलर ऑप्शन मध्ये आला आहे. तर Nokia 1.3 पण साइऐन, सँड आणि चारकोल कलर ऑप्शन मध्ये येईल. XpressMusic Nokia 5310 बद्दल बोलायचे तर कंपनीने 39 यूरो (जवळपास 3,129 रुपये) मध्ये सादर केला आहे.

Nokia 5.3 ची डिजाइन

डिजाइन बद्दल बोलायचे तर कंपनीने या फोन मध्ये फ्रंटला नॉच डिस्प्ले दिला आहे. या नॉच मध्ये फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या बॉटम आणि टॉप वगळता दोन्ही बाजूंना खूप कमी बेजल्स आहेत. तर टॉप आणि बॉटमला थोडे रुंद बेजल्स आहेत. फोनच्या डावीकडे कंपनीने डेडिटिकेटिड गूगल असिस्टेंट बटण दिले आहे. तर उजवीकडे पावर बटण आणि वॉल्यूम रॉकर बटण देण्यात आला आहे. बॉटमला टाइप-सी पोर्ट आणि टॉपला स्पीकर ग्रिल सह 3.5एमएम हेडफोन जॅक आहे. बॅक पॅनल बद्दल बोलायचे तर कंपनीने मागे सार्कुल कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यात क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. चार कॅमेऱ्यांच्या मधोमध एलईडी फ्लॅश लाइट आहे. फोनच्या कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर आणि त्याखाली कंपनीचे नाव आहे.

Nokia 5.3 चे स्पेसिफिकेशन्स

नोकिया इंडियाच्या लिस्टिंगनुसार Nokia 5.3 स्मार्टफोन मध्ये 6.55 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. फोनच्या फ्रंटला 2.5D ग्लास आणि वॉटरड्रॉप नॉच आहे. तसेच फोन मध्ये हा स्मार्टफोन 3GB रॅम, 4GB रॅम आणि 6GB रॅम ऑप्शन सह 64GB स्टोरेज सह येतो. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनची स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येईल. तसेच फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसरच्या पावर वर काम करेल.

फोटोग्राफीसाठी Nokia 5.3 स्मार्टफोनच्या मागे क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये 13 मेगापिक्सल, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे आणि हा Android 10 आउट ऑफ द बॉक्स वर चालतो.

Nokia 1.3 चे स्पेसिफिकेशन्स

यात 5.71 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोलूशन 720×1520 पिक्सल आहे. या स्मार्टफोन मध्ये 1GB रॅम आणि 16GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनची स्टोरेज 400GB पर्यंत वाढवता येईल. नोकियाचा हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 215 प्रोसेसर सह येतो.

Nokia 1.3 स्मार्टफोन Android 10 (Go एडिशन) वर चालतो. या फोनच्या मागे 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 5 मेगापिक्सलचा फिक्स्ड-फोकस सेल्फी कॅमेरा आहे. नोकियाच्या या स्मार्टफोन मध्ये गूगल असिस्टेंट बटण आहे. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 3,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Nokia 5310 चे स्पेसिफिकेशन्स

HMD Global ने आईकॉनिक XpressMusic Nokia 5310 फीचर फोन पुन्हा एकदा सादर केला आहे. नोकिया 5310 साल 2007 मध्ये लॉन्च केला गेला होता. म्यूजिक प्लेयर वापरण्यासाठी फोनच्या बाजूला बटण रेड कलर मध्ये देण्यात आले आहेत. तसेच फोन मध्ये 2.4 इंचाचा QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे आणि यात अल्फान्यूमरिक कीपॅड पण आहे. नवीन Nokia 5310 मध्ये 8MB रॅम आणि 16MB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड स्लॉट पण देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही फोनची स्टोरेज 32GB पर्यंत वाढवू शकता. फोन मध्ये मीडियाटेक MT6260A सीपीयू देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे फ्लॅश सह VGA कॅमेरा देण्यात आला आहे. नोकियाच्या या फोन मध्ये 3.5mm चा ऑडियो जॅक आणि ब्लूटूथ 3.9 देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी नोकिया 5310 मध्ये 1,200 mAh ची बॅटरी देण्यात आली असून या फोन मध्ये Series 30+ ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here