Nokia 8.3 5G लॉन्च, फोन मध्ये आहे 8जीबी रॅम, 64एमपी क्वॉड कॅमेरा आणि 4500एमएएच बॅटरी

Nokia ने आज दीर्घ प्रतीक्षेनंतर टेक बाजारात आपले नवीन प्रोडक्ट्स सादर केले आहेत. कंपनीने एक साथ तीन नवीन स्मार्टफोन आणि एक फीचर फोन ग्लोबल मंचावर लॉन्च केला गेला आहे ज्यात Nokia 8.3 5G, Nokia 5.3, Nokia 1.3 आणि Nokia 5310 चा समावेश आहे. हे तिन्ही डिवाईस वेगवेगळ्या प्राइज सेग्मेंट मध्ये लॉन्च झाले आहेत यातील नोकिया 5.3 स्मार्टफोन आणि नोकिया 5310 फीचर फोन कंपनीच्या इंडियन वेबसाइट वर पण लिस्ट झाले आहेत. कंपनीने आणलेल्या लेटेस्ट मोबाईलल्स मध्ये Nokia 8.3 5G सर्वात पावरफुल फोन आहे. नावांवरून समजते कि नोकिया 8.3 सह ब्रँडने 5जी क्षेत्रात नवीन पाऊल टाकले आहे. चला एक नजर टाकूया Nokia 8.3 5G च्या ताकदीवर.

डिजाईन

Nokia 8.3 5G कपंनीने पंच-होल डिजाईन वर सादर केला आहे. फोनचा डिस्प्ले बेजल लेस आहे पण खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. या भागात Nokia ची ब्रँडिंग आहे. डिस्प्लेच्या वर डावीकडे छोटासा होल देण्यात आला आहे आणि यात फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. तसेच Nokia 8.3 च्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो राउंड शेप मध्ये आहे. हा सर्क्युलर पॅनलच्या मधोमध आहे जो थोडा वर आला आहे. सर्कलच्या उजवीकडे डुअल फ्लॅश आहे. तसेच नोकिया 8.3 5जी च्या साईड पॅनल वर वाल्यूम रॉकर सह फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटण देण्यात आला आहे. फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईपी सी पोर्ट आहे.

स्पेसिफिकेशन्स

Nokia 8.3 5G कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.81 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ पंच होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. नोकियाने या स्क्रीनला प्योर डिस्प्लेचे नाव दिले आहे. कंपनीने नोकिया 8.3 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो एंडरॉयड वन आधारित आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट देण्यात आला आहे जो NSA/SA डुअल मोड 5जी सपोर्ट करतो.

नोकिया 8.3 5जी ग्लोबल मार्केट मध्ये दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा एक वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 400जीबी पर्यंत वाढवता येते. एंडरॉयड वन असल्यामुळे Nokia 8.3 ला पुढील दोन वर्षांपर्यंत एंडरॉयडचे सर्व लेटेस्ट अपडेट मिळतील.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 8.3 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.89 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 असलेल्या 12 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. नोकिया 8.3 मध्ये ZEISS लेंस टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 24 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Nokia 8.3 5G डुअल सिम फोन आहे जो डुअल मोड 5जी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट इम्बेडेड बटण देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो जी ओटीजी टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. ग्लोबल मंचावर Nokia 8.3 5G Polar Night कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

किंमत

Nokia 8.3 5G ची किंमत पाहता कंपनीने फोनचा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 599 यूरो मध्ये लॉन्च केला आहे जी किंमत भारतीय करंसीनुसार 48,000 रुपयांच्या आसपास आहे. तसेच फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 649 यूरो मध्ये लॉन्च केला गेला आहे आणि हि किंमत भारतीय करंसीनुसार 52,000 रुपयांच्या आसपास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here