200 रुपयांमध्ये विकत घ्या 27 दिवस बॅटरी बॅकअप दणारा Nokia चा 4G फोन, अशी आहे भन्नाट ऑफर

Nokia नं भारतीय बाजारात कोणताही गाजावाजा न करता या आठवड्यात मंगळवारी आपला फोन Nokia 8210 4G लाँच केला. हा स्वस्त फोन त्वरित अ‍ॅमेझॉन इंडियावर सेलसाठी देखील उपलब्ध झाला. तिथे फक्त 188 रुपये देऊन हा फोन विकत घेता येत आहे. हो, फक्त 188 रुपयांमध्ये हा 4G फोन ऑनलाइन विकत घेऊन तुमच्या घरी डिलिव्हरी होऊ शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं कसं होऊ शकतं, तर चला जाणून घेऊया की 3,999 रुपयांचा हा स्वस्त 4जी फोन (Chepeast 4G Phone) तुम्ही 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरी घेऊन येऊ शकता.

188 रुपये मासिक हप्त्यावर खरेदी करा नोकियाचा फोन

Nokia 8210 4G Volte keypad Phone बद्दल बोलायचं झालं तर हा हँडसेट ई-कॉमर्स साईट अ‍ॅमेझॉन इंडियावर एक्सेचेंज डिस्काउंट व्यतिरिक्त अ‍ॅमेझॉन पे ICICI Credit Card वर No Cost EMI वर विकत घेण्याचा पर्याय दिला जात आहे. तसेच जर तुम्ही फोन Indusind Bank Credit Card द्वारे विकत घेतला तर 24 महिन्यांच्या ईएमआयवर यासाठी दर महिन्याला फक्त 188 रुपये द्यावे लागतील. परंतु, 519 रुपयांचा व्याज ग्राहकांकडून घेतलं जाईल. त्यामुळं हा फोन ग्राहकांना 4158 रुपयांना पडेल. विशेष म्हणजे या फोनवर कंपनी एक वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी देत आहे.

इथे पाहा कोणत्या बँक क्रेडिट कार्डवर किती द्यावा लागेल ईएमआय

डेबिट कार्डवर EMI चा पर्याय सध्या काही निवडक बँकांच्या कार्डसाठी उपलब्ध आहे, ज्यात HDFC, ICICI, Axis, Kotak Mahindra, भारतीय स्टेट बँक आणि Federal चा समावेश आहे. चला Nokia 8210 4G चे फीचर्स जाणून घेऊया.

Nokia 8210 4G के फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Nokia 8210 4G मध्ये तुम्हाला 3.8 इंचाची स्क्रीन मिळते. कंपनीनं यात कलरफुल QVGA डिस्प्लेचा वापर केला आहे. हा फोन UniSoc T107 प्रोसेसरवर चालतो आणि यात तुम्हाला 128 एमबी मेमरीसह 48 एमबी रॅम देण्यात आला आहे. खास बाब म्हणजे या फोनमध्ये एक्सपांडेबल मेमरी सपोर्ट देण्यात आला आहे आणि तुम्ही 32जीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डचा वापर करू शकता, यासाठी एसडी कार्ड स्लॉट देखील मिळतो.

फोनमध्ये 3.5 MM ऑडियो जॅकसह मायक्रो यूएसबी पोर्ट आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ व्हर्जन 5 मिळतं. बॅटरी पाहता यात 1,450 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 27 दिवसांचा स्टँडबाय टाइम देते, असा दावा नोकियानं केला आहे. या फोनचं वजन फक्त 107 ग्राम आहे. यात तुम्हाला अल्फान्यूमेरिक कीपॅड मिळतो जो रबर फिनिशसह सादर करण्यात आला आहे. हा फोन त्या लोकांसाठी आहे ज्यांना कीपॅड असलेला फोन हवा आहे. स्मार्टफोन्सपासून दूर राहू इच्छिणारे लोक देखिली या फोनची निवड करू शकतात.

हा फोन ड्युअल सिमला सपोर्टसह बाजारात येतो. तसेच ऑपरेटिंग सिस्टम म्हणून ही सीरीज 30+ ओएसवर चालते. फोटोग्राफीसाठी यात 0.3 मेगापिक्सलचा VGA रिजोल्यूशन असलेला कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे कंपनीनं एफएम रेडियो आणि म्यूजिक प्लेयर सारखे फीचर्स देखील युजर्सच्या करमणुकीसाठी दिले आहेत. यातील FM रेडियो वायर आणि वायरलेस दोन्ही मोडमध्ये वापरता येतो. म्हणजे इयरफोन्सविना देखील एफएम रेडिओचा आनंद घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here