Nokia चा स्वस्त फोन Nokia 1.3 सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट, कमी किंमतीत होईल लॉन्च

Nokia-4.2
Nokia-4.2

Nokia ने या महिन्यात भारतीय बाजारात आपल्या डिवाईसेजची संख्या वाढत नवीन स्मार्टफोन Nokia 2.3 लॉन्च केला आहे. Nokia 2.3 साल 2019 चा अखेरचा नोकिया फोन म्हणता येईल. पण आपल्या स्मार्टफोन्सची सुरवात हि कंपनी नवीन वर्षाच्या सुरवातीला करू शकते. एका ताजा रिपोर्ट मध्ये Nokia च्या अजून एका नवीन डिवाईसची माहिती समोर आली आहे जो कंपनीचा आगामी स्मार्टफोन Nokia 1.3 असल्याचे बोलले जात आहे. एचएमडी ग्लोबल अधिकृत Nokia ब्रँडचा हा स्मार्टफोन ब्लूटूथ सर्टिफिकेशन्स साइट वर दिसला आहे जो लवकरच बाजारात एंट्री घेणार आहे.

Nokia 1.3 ब्लूटूथ एसआईजी वेबसाइट वर दिसला आहे. फोनची लिस्टिंग डेट वेबसाइट वर 20 डिसेंबर आहे. ब्लूटूथ एसआईजी वर हा आगामी नोकिया फोन Nokia TA-1213 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे जो ब्रँडचा आगामी डिवाईस Nokia 1.3 असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार Nokia 1.3 कंपनीच्या Nokia 1 Plus का अपग्रेडेड मॉडेल असेल.

ब्लूटूथ एसआईजी लिस्टिंग मध्ये Nokia चा हा आगामी स्मार्टफोन ब्लूटूथ 4.2 ने सर्टिफाइड केला गेला आहे. तसेच समोर आलेल्या माहितीनुसार Nokia 1.3 मध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 200 सीरीजचा चिपसेट दिला जाईल. मीडिया रिपोर्ट्स मध्ये चर्चा आहे कि हा चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 215 असू शकतो. कंपनी अजूनतरी Nokia च्या आगामी फोनची माहिती दिली नाही पण बोलले जात आहे कि Nokia TA-1213 मॉडेल नंबर असलेला हा स्मार्टफोन Nokia 1.3 च आहे जो ब्रँडचा एंट्री लेवल डिवाईस असेल आणि लो बजेट मध्ये लॉन्च केला जाईल.

Nokia 2.3

या फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता नोकियाच्या या बजेट स्मार्टफोन मध्ये 6.2 इंचाचा एचडी+ (720×1520 पिक्सल) इन-सेल डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 19:9 आहे. तर स्पीड आणि मल्टीटास्किंग साठी क्वाड-कोर मीडियाटेक हीलियो ए22 प्रोसेसर आहे. Nokia 2.3 मध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 400 जीबी पर्यंत वाढवता येते.

तसेच फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर, अपर्चर एफ/2.2 आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. कनेक्टिविटी साठी 4जी एलटीई, वाई-फाई 802.11 बी/ जी/एन, ब्लूटूथ वर्जन 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, माइक्रो-यूएसबी (v2.0) आणि 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅक आहेँ. तर स्मार्टफोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल. नोकिया 2.3 स्मार्टफोन एंड्रॉयड 9.0 पाई वर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here