अंबानींच्या जियोला टक्कर देण्यासाठी येतंय अदानींचं नवीन 5G नेटवर्क?

Mukesh Ambani नंतर भारतातील अजून मोठे बिजनेसमॅन Gautam Adani टेलीकॉम सेक्टरमध्ये एंट्री करणार आहेत. सर्वप्रथम ही बातमी लीकच्या माध्यमातून आली होती परंतु नंतर अदानी ग्रुपनं याबाबत माहिती दिल्यामुळे आता पुन्हा एकदा टेलीकॉम सेग्मेंटमध्ये मजा येणार आहे. आतापर्यंत अदानी ग्रुपनं टेलीकॉम सेक्टरमध्ये उतरलेलं नाही. परंतु या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या 5G सर्व्हिसच्या लिलावानंतर कंपनी या क्षेत्रात उतरू शकते. गौतम अदानी टेलीकॉम सेक्टरमध्ये आल्यामुळे मुकेश अंबानींच्या रिलायन्स जियो आणि सुनील भारती मित्तल यांच्या एयरटेलला टक्कर मिळेल, अशी चर्चा आहे. परंतु कंपनीनं स्पष्टपणे सांगितलं आहे की सध्या मोबाईल बिजनेसमध्ये नव्हे तर खाजगी बिजनेससाठी 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावात सहभाग घेतला जात आहे.

Adani ग्रुपची बाजू

याबाबत अदानी ग्रुपनं एका मीडिया स्टेटमेंटच्या माध्यमातून कंपनी 5जी सेग्मेंटमध्ये बिडिंगसाठी माहिती मिळत आहे परंतु सध्या कंज्यूमर मोबिलिटी सेग्मेंटमध्ये येण्याची योजना नाही, असं सांगितलं आहे. ते 5जी स्पेक्ट्रमचा वापर खाजगी व्यवसायसाठी करतील ज्यात एयरपोर्ट आणि पोर्ट बिजनेस सारख्या कामांचा समावेश असेल.

कधी होत आहे 5G स्पेक्ट्रमचा लिलाव

भारतात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव या महिन्यात 26 जुलैला होणार आहे. या लिलावसाठी मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जियो, सुनील भारती यांची एयरटेल आणि वोडाफोन आयडिया सारख्या कंपन्यांनी आधीच आपली रुची दाखवली आहे. त्यामुळे अदानी ग्रुपच्या येण्यामुळे ऑक्शन आणखी रंगतदार होण्याची अपेक्षा आहे. कंपनीनं सांगितलं आहे की सध्या टेलीकॉम सेक्टरमध्ये येणार नाही परंतु भविष्यातील शक्यता नाकारली नाही. त्यामुळे संपूर्ण टेलीकॉम विश्वाची यावर नजर असेल.

पिक्चर अभि बाकी है

कंपनीनं सांगितलं आहे की, ते मोबाईल टेलीकॉम सर्व्हिसमध्ये येत नाहीत परंतु अलीकडेच अदानी समूहाला NLD म्हणजे National Long-Distance Service चा परवाना मिळाला आहे जो सरकारी डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्यूनिकेशन (DOT) द्वारे मोबाईल सेवा देण्यासाठी दिला जातो. तसेच ग्रुपला DOT कडून ILD म्हणजे International Long Distance सर्व्हिसेजसाठी देखील परवाना मिळाला आहे. त्यामुळे कंपनीनं जरी आजची तयारी केली नसली तरी ही उद्याची तयारी आहे, याची सुरुवात 5जी स्पेक्ट्रममध्ये सहभागी घेऊन केली जाऊ शकते.

5G लिलावात काय होणार?

भारतात 5G स्पेक्ट्रमच्या लिलावसाठी ट्रायनं तयारी केली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या शिफारशीनुसार 5जी स्पेक्ट्रमच्या किंमती 40 टक्के करण्याची सूचना करण्यात आली होती, जिला कॅबिनेटची मान्यता मिळाली आहे. तसेच लिलावात मिळणाऱ्या परवान्याची वैधता देखील आता 20 वर्ष करण्यात आली आहे. तसेच अन्य काही अटी देखील शिथिल करण्यात आल्या आहेत.

5G स्पेक्ट्रमच्या लिलावसाठी यावेळी 600 मेगाहर्ट्ज, 700 मेगाहर्ट्ज, 800 मेगाहर्ट्ज, 900 मेगाहर्ट्ज, 1800 मेगाहर्ट्ज, 2100 मेगाहर्ट्ज, 2300 मेगाहर्ट्ज आणि 3300 मेगाहर्ट्ज मिडियम आणि 26 गीगाहर्ट्ज हाई फ्रीक्वेंसी बँड ठेवण्यात आले आहेत. तसेच 26 जुलै, 2022 पासून सुरु होणाऱ्या या लिलावात सरकारकडून कमीत कमी 4.3 लाख कोटी रुपयांचे एकूण 72,097.85 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम ब्लॉक ठेवण्यात येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here