Vivo Y100 5G फोन लाँच होण्याआधीच लीक झाली किंमत

Highlights

  • Vivo Y100 मध्ये 64MP Rear Camera मिळेल.
  • हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 900 5G प्रोसेसरवर काम करेल.
  • Vivo Y100 फेब्रुवारी मध्ये Vivo Y56 सह भारतात लाँच होईल.

91मोबाइल्सनं अलीकडेच एक एक्सक्लूसिव्ह बातमीच्या माध्यमातून सांगितलं होतं की विवो कंपनी आपल्या ‘वाय’ सीरीजमध्ये Vivo Y56 आणि Vivo Y100 स्मार्टफोन जोडण्याची तयारी करत आहे. हे दोन्ही मोबाइल फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच होतील. आता आमच्या टीमला यातील विवो वाय100 च्या प्राइसची माहिती देखील मिळाली आहे. हा विवो फोन 27 हजारांच्या रेंजमध्ये भारतात लाँच केला जाईल.

Vivo Y100 ची किंमत

मिळालेल्या माहितीनुसार विवो वाय100 इंडिया प्राइस 27,000 रुपयांच्या आसपास असू शकते. ही फोनच्या मोठ्या मेमरी व्हेरिएंटची किंमत असू शकते, त्यामुळे स्मार्टफोनची प्रारंभिक किंमत यापेक्षा कमी ठेवली जाऊ शकते. एवढं मात्र नक्की समजलं आहे की Vivo Y100 एक मिडबजेट स्मार्टफोन म्हणून भारतीय बाजारात एंट्री करू शकतो आणि फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात देशात सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.
हे देखील वाचा: भारतीय वेबसाइटवर दिसले सर्वांना परवडणारे रेडमीचे दोन फोन; लवकरच येणार बाजारात

Vivo Y100 Specifications

  • 64MP Rear Camera
  • HDR10+ AMOLED display
  • MediaTek Dimensity 900
  • 6GB RAM + 128GB storage

विवो वाय100 संबंधित माहितीनुसार हा मोबाइल फोन अ‍ॅमोलेड पॅनल डिस्प्लेसहवर लाँच केला जाऊ शकतो. या फोनची स्क्रीन एचडीआर10+ला सपोर्ट करू शकते तसेच यात 1300निट्स ब्राइटनेस मिळू शकते. स्क्रीन साईज व स्टाईल कशी असेल याची सविस्तर माहिती मिळाली नाही परंतु यात वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असण्याची शक्यता जास्त आहे.

Vivo Y100 स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी 900 प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो. हा विवो फोन 5जी कनेक्टिव्हिटीसह बाजारात येईल, हे स्पष्ट झालं आहे. फोन किती 5G Bands ना सपोर्ट करेल हे मात्र समोर आलं आहे. तसेच ग्राफिक्ससाठी या विवो मोबाइलमध्ये एआरएम माली-जी68 एमपी4 जीपीयू मिळू शकतो जो 900मेगाहर्ट्ज वर काम करू शकतो. हे देखील वाचा: Smartphone Battery Saving Tips: चार्ज केल्यावर 1-2 तासांत उतरते फोनची बॅटरी; अशी वाढवा बॅटरी लाइफ

विवो वाय100 स्मार्टफोन भारतीय बाजारात 6जीबी रॅमसह एंट्री करू शकतो, जोडीला 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. आशा आहे की फोनचे अन्य मेमरी व्हेरिएंट्स देखील बाजारात येतील. तसेच फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो जो ओआयएस टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो. फोनच्या अन्य फीचर्स व स्पेसिफिकेशन्ससाठी लाँचची वाट पाहावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here