12 जीबी रॅम आणि 5000एमएएच बॅटरी असलेला हा पावरफुल गेमिंग फोन होत आहे भारतात लॉन्च, बघा फोनची ताकद

टेक कंपनी Nubia ने गेल्या महिन्यात चीनी बाजरात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत Red Magic 3S लॉन्च केला होता. रेड मॅजिक सीरीज मध्ये लॉन्च झालेला हा डिवाईस एक गेमिंग फोन आहे जो पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येतो. चीन मध्ये यशस्वी झालेला हा दमदार फोन 5000एमएएच बॅटरी आणि 12 जीबी रॅमला सपोर्ट करतो. गेमिंगच्या भारतीय चाहत्यांसाठी खुशखबरी देत आज नुबियाने घोषणा केली आहे कि Red Magic 3S इंडियन मार्केट मध्ये पण लॉन्च केला जाईल.

Nubia Red Magic 3S ची माहिती Red Magic India ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वरून दिली आहे. कंपनीने फोनच्या लॉन्चची तारीख सांगितली नाही, लेकिन ट्वीट करून स्पष्ट केले आहे कि लवकरच हा पावरफुल गेमिंग स्मार्टफोन भारतीय बाजरात लॉन्च केला जाईल. आपल्या ट्वीट मध्ये नुबियाने एक वीडियो शेयर केला आहे जो 21 सेकंदांचा आहे. या वीडियो मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन प्लस चिपसेट दाखवत Red Magic 3S मधील कूलिंग टेक्नॉलॉजी टीज करण्यात आली आहे.

Nubia Red Magic 3S

Red Magic 3S ने चीनी मध्ये पाऊल टाकले आहे. फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 2,340 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन असेलल्या 6.65 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. हा नुबिया फोन कंपनीने 90हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्ले सह दिला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9.0 पाई आधारित आहे जो रेडमॅजिक ओएस 2.1 कस्टम स्कीन वर चालतो.

Nubia Red Magic 3S आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट 855 प्लस वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 640 जीपीयू आहे. चीनी बाजारात Red Magic 3S दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी पावरफुल रॅम मेमरी सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी यूएफसी 3.0 टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nubia Red Magic 3S च्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह एफ/1.75 अपर्चर असेलला 48 मेगापिक्सलचा Sony IMX586 सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Red Magic 3S डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच Red Magic 3S पावर बॅकअप साठी 27वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 5,000एमएएच च्या पावरफुल बॅटरी सह येतो.

Nubia Red Magic 3S भारतात कोणत्या तारखेला लॉन्च होईल आणि भारतीय बाजारात या गेमिंग फोनची किंमत किती असेल यासाठी कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here