अरे बाप रे! 1.28 लाखांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीची किंमत 87,298 रुपये, व्हायरल होत आहे बिल

Highlights

  • Ola S1 electric scooter च्या बॅटरीची किंमत स्कूटरच्या 60 टक्के आहे.
  • Ola S1 Pro के 4kWh battery ची प्राइस Rs 87,298 आहे.
  • Ola S1 आणि S1 Pro च्या बॅटरीवर 3 years/unlimited–kilometer वॉरंटी मिळते.

इलेक्ट्रिक स्कूटरची लोकप्रियता भारतात वेगानं वाढत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आता हाय-एन्ड ई-टूव्हीलर्स सादर करत आहेत. ईव्हीच्या किंमतीत सर्वात मोठं योगदान अजूनही बॅटरीचं आहे आणि ग्राहकांना नेहमीच जाणून घेण्याची उत्सुकता असते की बॅटरी बदलण्यासाठी किती वेळ लागेल. परंतु अलीकडेच व्हायरल झालेल्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीची किंमत पाहून ग्राहकांना टेंशन आलं आहे. ओला एस1 प्रोच्या 4kWh बॅटरी पॅकची किंमत व्हायरल होत आहे जी 87,298 रुपये आहे.

पाहा 4kWh Ola battery ची किंमत

तुम्ही खाली फोटोजमध्ये पाहू शकता की ओला एस1 प्रोसाठी ओला 4kWh (3.97kWh) बॅटरी पॅकची किंमत 87,298 रुपये आहे. तर ओला इलेक्ट्रिक 3 वर्ष किंवा अनलिमिटेड किलोमीटरची वॉरंटी देते. बॅटरी पॅक बदलण्याचा खर्च वाहनाच्या किंमतीच्या 62 टक्के पर्यंत आहे. सध्या Ola S1 Pro डिस्काउंटसह विकली जात आहे आणि हिची किंमत 1.28 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. हे देखील वाचा: 1 मार्चला लाँच होईल Vivo V27 Series, पाहा कोण-कोणते फोन येणार बाजारात

बॅटरी पॅकच्या पॅकेजिंगवरील लेबलवर 66,549 रुपयांची एमआरपी लिहिण्यात आली आहे. तसेच, ओला एस1 प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 99,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. याचा अर्थ असा आहे की ओला एस1 इलेक्ट्रिक स्कूटरवर बॅटरी पॅकची किंमत ईव्हीच्या एकूण किंमतीच्या 66 टक्के आहे. गेल्यावर्षी, असाच एक फोटो चर्चेचा विषय ठरला होता, कारण Tata Nexon EV च्या बॅटरी बदलण्याचा खर्च 7 लाख रुपये आला होता.

बॅटरी पॅक दीर्घकाळ चालतात. परंतु अनेकदा ही बदलण्याची आवश्यकता असते. परंतु बॅटरीची किंमत स्कूटरच्या किंमतीपेक्षा जास्त असल्यामुळे ग्राहक आता घाबरू लागले आहेत. तसेच पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याआधी विचार करत आहेत. हे देखील वाचा: iPhone 14 Pro सारखा डिस्प्ले, 2-2 सेल्फी कॅमेरे; लाँचपूर्वीच Xiaomi 13 Lite ची किंमत लीक

OLA S1 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

ओला एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर 58Nm टार्क, 8.5kW च्या मोटरसह येते ज्यामुळे स्कूटर 3 सेकंदात 0-40kmph चा स्पीड गाठू शकते. याव्यतिरिक्त कंपनीचा दावा आहे की स्कूटरमध्ये ताशी 115 किमीचा टॉप स्पीड मिळेल. स्कूटरमध्ये पुढे आणि मागे एक डिस्क ब्रेक आहे आणि यात 36L अंडर-सीट बूट स्पेस मिळते. तसेच ओला एस1 प्रो बद्दल कंपनीनं दावा केला आहे की यात 181 किमी आणि जवळपास 135 किमीची वास्तविक रेंज मिळते. ही इलेक्ट्रिक स्कूटर फुल चार्ज होण्यास जवळपास 6.5 तास लागतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here