MWC 2023 मधील लाँचपूर्वीच Xiaomi 13 Lite ची किंमत लीक

Highlights

  • Xiaomi 13 Lite 5G ची स्क्रीन स्टाईल iPhone 14 Pro सारखी असेल.
  • फोनच्या फ्रंट पॅनलवर 32MP Dual Selfie Camera दिला जाऊ शकतो.
  • या फोनची किंमत 499 यूरोच्या आसपास असू शकते.

Xiaomi 13 Pro 26 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल आणि त्याचबरोबर कंपनी Xiaomi 13 देखील भारतात आणू शकते. आता बातमी आली आहे की शाओमी आपल्या नंबर सीरीजमध्ये आणखी एक स्मार्टफोन Xiaomi 13 Lite जोडण्याची तयारी करत आहे जो आगामी काळात मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. शाओमी 13 लाइट MWC 2023 च्या मंचावरून सादर केला जाऊ शकतो परंतु ताज्या लीकमध्ये या फोनच्या घोषणेपुर्वीच किंमतीची माहिती समोर आली आहे.

Xiaomi 13 Lite 5G Price

शाओमी 13 लाइट बद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल फोन 8 जीबी रॅमसह लाँच केला जाऊ शकतो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. लीकनुसार या स्मार्टफोनची किंमत 499 यूरोच्या आसपास असू शकते. ही किंमत भारतीय करंसीनुसार जवळपास 44,000 रुपये आहे. परंतु जर भारतात आला तर किंमत कमी होऊ शकते. लीकनुसार Xiaomi 13 Lite 5G फोन ग्लोबल मार्केटमध्ये Black, Blue आणि Pink कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: BSNL चे डेली 2GB Data देणारे Prepaid Plan, कमी खर्चात मिळतील जास्त बेनिफिट्स

Xiaomi 13 Lite 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.55″ FHD+ 120Hz AMOLED
  • 8GB RAM + 128GB Storage
  • Qualcomm Snapdragon 7 Gen 1
  • 50MP Triple Rear Camera
  • 32MP Dual Selfie Camera
  • 67W 4,500mAh battery

शाओमी 13 लाइटचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या लीक्स नुसार हा स्मार्टफोन 6.55 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असू शकते जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करू शकते तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकते. लीकनुसार फोन डिस्प्लेमध्ये 1920हर्ट्ज पीडब्ल्यू डिमिंग आणि 1000निट्स ब्राइटनेस सारखे फीचर्स मिळू शकतात.

Xiaomi 13 Lite 5G फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 13 सह काम करू शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी शाओमी फोनमध्ये 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,500एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: 1 मार्चला लाँच होईल Vivo V27 Series, पाहा कोण-कोणते फोन येणार बाजारात

फोटोग्राफीसाठी शाओमी 13 लाइट 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असू शकतो. यात 50 मेगापिक्सलच्या सोनी आयएमएक्स766 प्रायमरी सेन्सरसह 20 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरचा समावेश असू शकतो. तसेच फ्रंट पॅनलवर 32 मेगापिक्सलचा ड्युअल सेन्सर सेन्सर असू शकतो, असं लीकमध्ये समोर आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here