वनप्लस 6 झाला एचडीएफसी बँकेच्या वेबसाइट वर लिस्ट, लॉन्च च्या आधी स्पेसिफिकेशन्स आले समोर

वनप्लस ने सांगितले की 17 मे ला कंपनी भारतात आपला नवीन फ्लॅगशिप कीलर स्मार्टफोन वनप्लस 6 लॉन्च करणार आहे. फोन लॉन्च साठी अजून दोन आठवडे आहेत आणि वनप्लस फॅन्स आणि स्मार्टफोन यूजर्स मध्ये प्रचंड उत्साह आहे. वनप्लस 6 च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल तसे अनेक लीक्स समोर आले आहेत पण कंपनी ने आता पर्यंत फोन स्पेसिफिकेशन्स वरून पडदा हटवला नाही. तर दुसरीकडे फोन लॉन्च च्या आधी आता एचडीएफसी बँक ने आपल्या स्मार्टबॉय पेज वर वनप्लस 6 चे स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत.

एचडीएफसी बँक ने आपल्या स्मार्टबॉय पेज वर वनप्लस 6 लिस्ट केला आहे. या लिस्टिंग मध्ये फोन चे काही स्पेसिफिकेशन्स पण लिहिण्यात आले आहेत. बँक च्या पेज वर वनप्लस 6 स्मार्टफोन चा फोटो लावण्यात आला आहे. या पेज वर सांगण्यात आलेल्या स्पेसिफिकेशन्स नुसार वनप्लस 6 मध्ये 5.7-इंचाची मोठी स्क्रीन दिली जाईल तसेच हा फोन एंडरॉयड च्या लेटेस्ट वर्जन 8.0 ओरियो सह येईल. वनप्लस 6 च्या या लिस्टिंग मध्ये फोन मध्ये 8जीबी ची रॅम मेमरी असण्याची बाब समोर आली आहे. तसेच फोन मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज सांगण्यात आली आहे.

लिस्टिंग मध्ये सांगण्यात आले आहे की हा फोन जीएसएम फोन असेल आणि डुअल सिम कार्ड सपोर्ट सह येईल. या लिस्टिंग मध्ये फोन च्या कॅमेरा सेग्मेंट तसेच चिपसेट ची माहिती देण्यात आली नाही पण आधी आलेल्या लीक्स नुसार हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल आणि फोन मध्ये 20-मेगापिक्सल आणि 12-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा मिळेल.

असा दिसतय की वनप्लस 6 च्या सेल साठी कंपनी आणि एचडीएफसी बँक मध्ये काही समझोता झाला आहे ज्या अंर्तगत एचडीएफसी कार्ड धारकांना अतिरिक्त सूट व अन्य फायदे दिले जातील. त्यामुळे एचडीएफसी बँकेकडून शेयर झालेले वनप्लस 6 चे की हे स्पेसिफिकेशन्स चुकीचे म्हणू शकत नाही. पण तरीही फोन च्या सर्व स्पेसिफिकेशन्स साठी 17 मे ची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here