OnePlus Ace 2 चा आणखी मॉडेल होऊ शकतो लाँच; लीक झाली माहिती

Highlights

  • OnePlus Ace 2 चा अजून एक नवीन मॉडेल लाँच होऊ शकतो.
  • हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 9000 सह येऊ शकतो.
  • या चिपसेटसह लाँच होणारा हा पहिला वनप्लस स्मार्टफोन असू शकतो.

वनप्लसनं अलीकडेच OnePlus Ace 2 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा मोबाइल चीनमध्ये उपलब्ध झाला असून Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरवर चालतो. आता बातमी येत आहे की कंपनी या स्मार्टफोनचा आणखी एक नवीन मॉडेल आणण्याची योजना बनवत आहे जो MediaTek Dimensity 9000 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे आजपर्यंत कोणत्याही वनप्लस फोनमध्ये या प्रोसेसरचा वापर करण्यात आला नाही.

नवीन वनप्लस एस 2 बद्दल वेबसाइट मायड्रायव्हर्सनं बातमी प्रकाशित केली आहे की हा मोबाइल काही दिवसांपूर्वी आलेल्या OnePlus Ace 2 चा दुसरा मॉडेल येऊ शकतो. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये प्रोसेसर आणि डिस्प्ले मात्र वेगवेगळा असू शकतो. नवीन मॉडेल 4एनएम फॅब्रिकेशन प्रोसेसरवर बनलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 9000 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो तसेच यात 1.5के पिक्सल रिजोल्यूशन असलेली फ्लॅट स्क्रीन मिळू शकते. हा फोन देखील सर्वप्रथम चीनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: अ‍ॅमेझॉनवरून विकला जाईल शाओमीचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली फोन; तारीख ठरली

OnePlus Ace 2 Specifications

  • 6.74″ AMOLED 120Hz Display
  • 16GB RAM + 512GB Storage
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen 1
  • 50MP Triple Rear + 16MP Selfie
  • 100W SuperVOOC fast charging

वनप्लस एस 2 5जी चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता चीनमध्ये हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 चिपसेटवर लाँच झाला आहे जो 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे तसेच 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. हा मोबाइल फोन 16जीबी पर्यंतच्या रॅम आणि 512जीबी पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13.0 वर चालतो.

OnePlus Ace 2 मध्ये फोन 2772 x 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.74 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1450निट्स ब्राइटनेस सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. या फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस स्टीरियो स्पिकर, ब्लूटूथ 5.2 आणि वायफाय सारखे फीचर्स देखील मिळतात. हे देखील वाचा: आयफोनच्या तोडीची OPPO Reno 10 सीरिज येणार बाजारात; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन लीक

फोटोग्राफीसाठी वनप्लस एस 2 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी आयएमएक्स890 सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here