Realme 10 4G लाँच होण्याआधीच प्राइस लीक; नोव्हेंबरमध्ये येऊ शकतो बाजारात

Realme C35 Price

रियलमी वाइस प्रेसिडेंट माधव सेठ यांनी खुलासा केला आहे की कंपनी आपली Realme 10 Series पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये लाँच करेल. ऑफिशियल लाँच डेट तर समोर आली नाही परंतु रियलमी 10 सीरीज 5 नोव्हेंबरला ग्लोबली लाँच होऊ शकते तसेच मिड नोव्हेंबरमध्ये भारतात लाँच होऊ शकते, अशी चर्चा सुरु आहे. आता एका नवीन लीकमध्ये Realme 10 4G India Price आणि Specifications देखील समोर आले आहेत. नवीन रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की रियलमी 10 किती रुपयांमध्ये भारतात लाँच होईल.

Realme 10 4G ची संभाव्य किंमत

सर्वप्रथम किंमत पाहता रियलमी 10 4जी स्मार्टफोनबद्दल सांगण्यात आले आहे की हा एक मिडबजेट मोबाइल फोन असू शकतो जो भारतात 17,000 रुपये ते 19,000 रुपयांदरम्यान लाँच होऊ शकतो. लीकनुसार, ऑफर्स व डील्ससह Realme 10 4G बेस व्हेरिएंट जवळपास 15,000 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. या बेस मॉडेलमध्ये 6 जीबी पर्यंतच्या रॅम मिळू शकतो. हा फोन Pink आणि Grey कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. हे देखील वाचा: इलॉन मस्कनी विकत घेतलं ट्विटर, पदावरून हटवल्यावर CEO पराग अग्रवाल यांना मिळाला मोठा मोबदला

Airtel 5G Plus Launched Check Your Smartphones Compatible Airtel 5G

Realme 10 4G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

रियलमी 10 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार, हा स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली असेल जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करू शकतो. फोन डिस्प्लेवर पांडा ग्लासचा प्रोटेक्शन असण्याची माहिती लीकमधून समोर आली आहे.

Realme 9 Pro Plus

Realme 10 4G फोन मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 5जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट देण्याचा खुलासा लीकमध्ये झाला आहे. म्हणजे जर रियमली 10 4जी बेस व्हेरिएंट 6 जीबी रॅमवर लाँच झाला तर त्यात 11 जीबी रॅम पर्यंतची परफॉर्मन्स मिळू शकते. लीकनुसार हा मोबाइल फोन LPDDR4x RAM आणि UFS 2.2 storage टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: 13 हजारांच्या बजेटमध्ये Redmi चा 5G Phone; क्वॉलकॉमच्या नव्या प्रोसेसरसह Redmi Note 12 5G लाँच

फोटोग्राफीसाठी रियलमी 10 4जी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळू शकतो ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्सचा समावेश असू शकतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर दिला जाऊ शकतो. लीकनुसार Realme 10 4G 33वॉट फास्ट चार्जिंग आणि 5,000एमएएच बॅटरीवर लाँच होऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here