OnePlus Nord 3 ची महत्वाची माहिती लीक; प्राइस आणि स्पेसिफिकेशनसह लाँच टाइमलाईनचा खुलासा

Highlights

  • OnePlus Nord CE 3 Lite नंतर आता नॉर्ड 3 लाँच होईल.
  • हा वनप्लस मोबाइल मे च्या अखेरीस बाजारात येऊ शकतो.
  • OnePlus Nord 3 ची प्राइस आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत.

OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन भारतात लाँच झाला आहे जो 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. आता कंपनी भारतात अजून एक डिवाइस सादर करण्याची योजना बनवत आहे. बातमी आहे की लवकरच देशात ‘नॉर्ड’ सीरीज अंतगर्त OnePlus Nord 3 स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. एक नवीन लीकमध्ये नॉर्ड 3 प्राइस रेंज आणि स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत.

वनप्लस नॉर्ड 3 ची किंमत (लीक)

OnePlus Nord 3 संबंधित नवीन लीक टिपस्टर योगेश बरारनं शेयर केलं आहे. किंमत पाहता योगेशनुसार नॉर्ड 3 ची किंमत भारतात जवळपास 30 हजार रुपयांपासून सुरु होऊ शकते आणि या फोनच्या सर्वात मोठ्या मॉडेलची किंमत 40 हजारांच्या बजेट पर्यंत जाऊ शकते. हे देखील वाचा: 17 एप्रिलला येतोय Samsung Galaxy M14 5G भारतात; मिळेल 50MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी

वनप्लस नॉर्ड 3 भारतात कधी लाँच होईल

लीकमध्ये नेमकी तारीख तर सांगण्यात आली नाही परंतु लाँच टाइमलाईनची माहिती मिळाली आहे. टिपस्टरनं दावा केला आहे की OnePlus Nord 3 पुढील 6 ते 8 आठवड्यांच्या आत बाजारात सादर केला जाईल. म्हणजे हा वनप्लस मोबाइल मे च्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला भारतात लाँच होऊ शकतो.

वनप्लस नॉर्ड 3 चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 6.7″ 1.5K AMOLED
  • 120Hz Refresh rate
  • MediaTek Dimensity 9000
  • 64+8+2MP Rear Camera
  • 16MP Selfie Camera
  • 5,000mAh Battery
  • 80W Fast Charging

OnePlus Nord 3 चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीकमध्ये दावा केला जात आहे की हा मोबाइल फोन 6.7 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेला सपोर्ट करेल जो 1.5के रिजोल्यूशनसह येईल. या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल.

वनप्लस नॉर्ड 3 एक 5जी फोन असेल ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक डिमेनसिटी 9000 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हा मोबाइल अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच होईल जोडीला ऑक्सिजन ओएसची युआय लेयर मिळू शकते.

फोटोग्राफीसाठी OnePlus Nord 3 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. लीकनुसार याच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो जोडीला 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे इतर सेन्सर मिळू शकतात. तसेच फ्रंट पॅनलवर 16एमपीचा सेल्फी सेन्सर दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: OnePlus Nord CE 3 Lite 5G झाला भारतात लाँच; फोनमध्ये 108MP कॅमेऱ्यासह 16GB रॅम

OnePlus Nord 3 बद्दल लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल फोन 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात एंट्री करू शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळेल असं टिपस्टर योगेश बरारनं सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here