शाओमीनं लाँच केले दोन बजेट स्मार्टफोन Redmi A2 आणि Redmi A2+, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

Highlights

  • शाओमीनं Redmi A2 आणि A2+ दोन फोन लाँच केले आहेत.
  • दोन्ही स्मार्टफोनमध्ये स्पेसिफिकेशन्स एक सारखे आहेत.
  • Redmi A+ मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.

Xiaomi नं कोणताही गाजावाजा न करता एंट्री लेव्हल A-सीरीजचे दोन स्मार्टफोन Redmi A2 आणि Redmi A2+ ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केले आहेत. रेडमीच्या या दोन्ही स्मार्टफोनमध्ये जास्त फरक नाही दोन्ही फोनमध्ये MediaTek Helio G36 प्रोसेसर देण्यात आला आहे. फीचर्स पाहता दोन्ही फोनमध्ये 6.52-इंचाचा LCD डिस्प्ले आणि 3GB पर्यंतच्या रॅम देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि मायक्रो USB पोर्ट देण्यात आला आहे. रेडमी A2+ मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो जो Redmi A2 मध्ये नाही.

Redmi A2 आणि Redmi A2+ चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.52” HD+ LCD Display
  • MediaTek Helio G36 SoC
  • 8MP+ QVGA Dual Camera, 5MP Front camera
  • 5000mAh Battery

Redmi A2 आणि Redmi A2+ दोन्ही स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स एक सारखे आहेत. दोन्ही फोनमध्ये 6.52-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन HD+ (1600 x 720 पिक्सल) आणि अ‍ॅस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे. रेडमीच्या या फोन्समध्ये MediaTek Helio G36 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. तसेच ग्राफिक्ससाठी IMG PowerVR GE8320 GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 3GB पर्यंत LPDDR4X RAM आणि 32GB पर्यंतची eMMC 5.1 स्टोरेज देण्यात आली आहे. हे देखील वाचा: 30 मार्चला भारतात येतोय Redmi Note 12 4G; मिळणार 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

Redmi च्या दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोन्समध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 8MP च्या प्रायमरी कॅमेऱ्यासह QVGA सेकंडरी लेन्स मिळते. फोनच्या रियर पॅनलवर LED फ्लॅश आहे. यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. Redmi च्या एंट्री लेव्हल फोन्समध्ये 5000mAh ची बॅटरी, 10W चार्ज आणि मायक्रो यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे.

Redmi A2 आणि Redmi A2+ लाइट ब्लू, ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये बाजारात आले आहेत. कनेक्टिव्हिटी ऑप्शन पाहता दोन्ही फोन ड्युअल सिम, 4G, 2.4GHz वायफाय, ब्लूटूथ 5.0, GPS, Glonass, आणि Galileo ला सपोर्ट करतात. तसेच फोन Android 12 (Go Edition) वर चालतात. यातील फरक म्हणजे फक्त Redmi A2+ मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. हे देखील वाचा: Redmi 12C 30 मार्चला होईल भारतात लाँच, किंमत असू शकते 8 हजारांपेक्षा कमी

किंमत आणि उपलब्धता

Xiaomi नं सध्या या दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमतीची घोषणा केली नाही. हे ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. दोन्ही फोन शाओमीच्या ग्लोबल वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहेत. सध्या इंडिया लाँच बद्दल देखील कंपनीनं माहिती शेयर केली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here