7 एप्रिलला भारतात लाँच होईल POCO C51; 8 हजारांच्या आसपास असू शकते किंमत

Highlights

  • POCO C51 लो बजेट स्मार्टफोन असेल.
  • याची किंमत 8 हजारांच्या बजेटमध्ये असू शकते.
  • हा फोन 3GB Extended RAM ला सपोर्ट करेल.

POCO C51 7 एप्रिलला भारतात लाँच होईल. विशेष म्हणजे हा फोन काही काळासाठी फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला होता. ही मायक्रो साइट आता हटवण्यात आली आहे. परंतु त्याआधीच पोको सी51 इंडिया लाँचची माहिती तसेच फोनचा लुक व डिजाईन सोबतच अनेक महत्वाचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. पोको सी51 स्मार्टफोनची किंमत 7 एप्रिलला घोषित केली जाईल.

पोको सी51 ची भारतातील संभाव्य किंमत

पोकोनं अजूनतरी पोको सी51 च्या किंमतीची माहिती दिली नाही परंतु फोनची प्राइस 7 एप्रिलला समोर येईल. POCO C51 एक लो बजेट डिवायस असेल आणि आम्हाला अपेक्षा आहे की या फोनची प्रारंभिक किंमत 8 हजारांच्या आसपास असू शकते. हा पोको फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. हे देखील वाचा: Vivo T2 5G सीरीज येतेय भारतात; फ्लिपकार्टवर लिस्ट झाला फोन

पोको सी51 चे लीक फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

  • 6.52″ HD+ Display
  • MediaTek Helio G36
  • 7GB Turbo RAM
  • Android 13 Go
  • 8MP Rear Camera
  • 5MP Selfie Sensor
  • 5,000mAh Battery

POCO C51 बद्दल माहिती समोर आली आहे की हा फोन 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाईल. या फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली असेल जी 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करेल. हा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच स्टाईलसह बाजारात येईल.

पोको सी51 अँड्रॉइड 13 ‘गो’ एडिशन वर लाँच केला जाईल जो 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या 12एनएम मीडियाटेक हीलियो जी36 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालेल. या फोनमध्ये 3जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजी असेल जी फोनचा इंटरनल 4जीबी रॅम 7जीबी रॅम पर्यंत बूस्ट करेल.

फोटोग्राफीसाठी POCO C51 च्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा दिला जाईल. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि सेकंडरी एआय लेन्सचा समावेश करण्यात येईल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी पोको सी51 स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. हे देखील वाचा: 12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह OPPO A1 5G चीनमध्ये लाँच; जाणून घ्या किंमत

POCO C51 बद्दल कंपनीनं खुलासा केला आहे की हा मोबाइल फोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करेल. तसेच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येईल. या पोको फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट, 3.5एमएम जॅक आणि मायक्रो यूएसबी पोर्ट मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here