OnePlus Nord CE 3 च्या कथित लाइव्ह इमेजेस झाल्या लीक

Highlights

  • OnePlus Nord CE 3 ची एक लाइव्ह इमेज ऑनलाइन लीक
  • आगामी नॉर्डमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप
  • हा फोन यंदा जूनमध्ये ग्राहकांच्या भेटीला येण्याची शक्यता

चायनीज स्मार्टफोन कंपनी OnePlus आता फक्त फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करणारी कंपनी राहिली नाही. ग्राहक संख्या वाढवण्यासाठी आता कंपनीनं मिडरेंज आणि बजेट डिवाइस देखील बाजारात आणेल आहेत. वनप्लस आता OnePlus Nord CE 3 नावाच्या आणखी एका मिड रेंज स्मार्टफोनची योजना बनवत आहे. आता लाँचपूर्वीच या स्मार्टफोनची लाइव्ह इमेज ऑनलाइन लीक झाली आहे. टेक वेबसाइट Rmupdate नं टिपस्टर Gadgetsdata च्या मदतीनं OnePlus Nord CE 3 च्या कथित लाइव्ह इमेजेस मिळवल्या आहेत. हे फोटो याआधी टिपस्टर OnLeaks ने दिलेल्या माहितीशी मिळतेजुळते आहेत. चला जाणून घेऊया आगामी वनप्लस स्मार्टफोनची डिजाईन, लाँच डेट आणि स्पेसिफिकेशन्स.

वनप्लस नॉर्ड सीई 3 ची लीक डिजाईन

लीक इमेजेसनुसार आगामी OnePlus Nord CE 3 स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजूला दोन वर्तुळाकार कॅमेरा कटआऊट मिळतील. या कॅमेरा सेटअप तीन कॅमेरे आणि एक एलईडी फ्लॅश दिला जाईल. वरच्या कटआऊटमध्ये एक कॅमेरा सेन्सर असेल, तर उर्वरित दोन खालच्या कटआऊटमध्ये मिळतील. हे देखील वाचा: दोन फोन आणि एक स्वस्त लॅपटॉप घेऊन येतेय ही छोटी कंपनी; रेडमी-रियलमीची वाट लागणार का?

इमेजेसनुसार या स्मार्टफोनची फ्रेम प्लास्टिकपासून बनवण्यात येईल. तसेच रिपोर्ट्सनुसार OnePlus Nord CE 3 च्या फ्रंटला एक पंच-होल डिजाईन असलेला डिस्प्ले देण्यात येईल. या कटआऊटमध्ये कंपनी सेल्फी कॅमेरा देईल. फोनमध्ये इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळणार नाही, तर साइड माउंटेड सेन्सर असेल. ऑनलिक्सच्या रेंडर्सनुसार या वनप्लसमध्ये पावर बटन आणि व्हॉल्युम रॉकर डावीकडे मिळतील.

वनप्लस नॉर्ड सीई 3 ची संभाव्य लाँच डेट

वनप्लस येत्या 7 फेब्रुवारीला भारतात OnePlus 11 हा कंपनीचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करणार आहे. परंतु, रिपोर्ट्सनुसार OnePlus Nord CE 3 सध्या देशात कोडनेम Larry अंतर्गत टेस्ट केला जात आहे आणि हा फोन यावर्षी जूनमध्ये ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. कंपनीनं मात्र OnePlus Nord CE 3 च्या लाँच डेट बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. हे देखील वाचा: BGMI खेळण्यासाठी बजेटमध्ये फोन हवा? रेडमी नोट 12 सीरीजमध्ये नव्या प्रोसेसरसह येतोय Note 12 Turbo

वनप्लस नॉर्ड सीई 3 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

OnePlus Nord CE 3 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन फुल एचडी+ फ्लॅट डिस्प्लेसह बाजारात येऊ शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. फोनच्या मागे 108MP प्रायमरी कॅमेरा देखील मिळू शकतो. याआधी आलेल्या रिपोर्ट्सनुसार, 6.7-इंचाचा IPS LCD पॅनल देण्यात येईल, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकतो. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यात 108MP+2MP+2MP चे सेन्सर असू शकतात. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 695 चिपसेट असण्याची शक्यता आहे. जोडीला यात 12GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी असू शकते जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here