OnePlus च्या फोल्डेबल फोनची डिजाइन आली समोर, पाहा कसा दिसू शकतो हा डिवाइस

Highlights

  • OnePlus V Fold लवकरच येऊ शकतो बाजारात.
  • फोनमध्ये फॉक्स लेदर बॅक पॅनल मिळू शकतो.
  • डिवाइस स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरवर चालू शकतो.

वनप्लसनं वर्षांच्या सुरुवातीला आपला पहिला फोल्डेबल फोन लाँच करण्याची घोषणा केली होती जो OnePlus V Fold नावानं बाजारात येऊ शकतो. आता ह्या घडी होणाऱ्या स्मार्टफोनचे डिजाइन रेंडर्स लीकमध्ये समोर आले आहेत. असं बोललं जात आहे की OnePlus Fold भारतात ऑगस्टमध्ये लाँच होऊ शकतो. चला पाहूया ह्या फोनची लीक झालेली डिजाईन.

OnePlus V Fold डिजाइन (लीक)

OnePlus V Fold बद्दल टिप्सटर OnLeaks नं SmartPrix सह मिळून डिजाइन रेंडर्स शेयर केले आहेत. ह्यात डिवाइस मोठा डिस्प्ले आणि Hasselblad-tuned कॅमेऱ्यासह दिसला आहे. ह्यात फॉक्स लेदर बॅक पॅनल देण्यात आला आहे, जो प्रीमियम लुक देत आहे. फोनमध्ये ग्लास किंवा मेटल बॅक मॉडेल असण्याची शक्यता आहे.

  • वनप्लस फोल्डेबल फोनमध्ये सर्कुलर कॅमेरा मॉड्यूल आहे. ह्यात हॅसलब्लॅड टेक्स्ट दिसत आहे.
  • V Fold च्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये पेरिस्कोप लेन्स देखील असेल. रियर पॅनलवर एलईडी फ्लॅश देखील दिसत आहे.
  • स्मार्टफोनची फ्रेम फ्लॅट आहे. तुम्ही डावीकडे अलर्ट स्लाइडर पाहू शकता. पावर बटन आणि फिंगरप्रिंट स्कॅनर उजवीकडे आहे.
  • मोबाइलच्या फ्रंटला पातळ बेझलसह एक मोठा डिस्प्ले आहे. फ्रंट कॅमेऱ्यासाठी टॉप सेंटरमध्ये पंच होल कटआउट देण्यात आली आहे. आतल्या बाजूस फोल्डेबल डिस्प्लेमध्ये टॉप लेफ्ट कॉर्नरवर पंच होल कटआउट आहे.

OnePlus V Fold लीक स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : रिपोर्टमध्ये फोनच्या डिस्प्ले साइजचा उल्लेख नाही. परंतु OnePlus V Fold मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 2K AMOLED डिस्प्ले सपोर्ट मिळू शकतो.
  • प्रोसेसर : वनप्लसच्या घडी होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये पावरफुल स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • कॅमेरा : वनप्लस फोल्ड फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसह 50MP चा प्रायमरी कॅमेरा असू शकतो. इतर लेन्सची माहिती मिळाली नाही. सेल्फीसाठी ह्यात 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी : हा फोन 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4800mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here