5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम असलेला OPPO A54 भारतात लॉन्च, बघा याची किंमत

OPPO ने आज भारतात आपल्या ‘ए’ सीरीजचा विस्तार करत नवीन स्मार्टफोन OPPO A54 लॉन्च केला आहे. आर्कषक लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेला हा मोबाईल 5,000एमएएचची मोठी बॅटरी आणि 6 जीबी रॅमला सपोर्ट करतो. भारतात हा फोन 13,490 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला गेला आहे जो येत्या एप्रिलपासून शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. OPPO A54 ची संपूर्ण माहिती देण्यापूर्वी सांगू इच्छितो कि उद्या म्हणजे 20 एप्रिलला OPPO A74 5G फोन पण भारतात लॉन्च होणार आहे. (OPPO A54 Officially launch in india specs price rs 13490 sale offer)

लुक व डिजाईन

OPPO A54 कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खाली बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वर डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला होल आहे. फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो चौकोनी आकारात आहे. हा फोन 3D Delicate Design वर बनला आहे.

फोनच्या उजव्या पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनलवर सिम स्लॉट आहे. ओपो ए54 च्या लोवर पॅनलवर यूएसबी टाईप सी पोर्ट व स्पीकर ग्रिल देण्यात आला आहे. ओपोचा हा फोन Starry Blue, Crystal Black आणि Moonlight Gold कलरमध्ये विकत घेता येईल. फोनचे डायमेंशन 163.6×75.7×8.4एमएम आणि वजन 192ग्राम आहे.

हे देखील वाचा : Infinix Hot 10 Play स्मार्टफोन 6000mAh बॅटरी आणि 6.82 इंचाच्या डिस्प्लेसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

OPPO A54 कंपनीने 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. ओपोचा हा फोन आईपीएक्स4 रेटेड आहे ज्यामुळे हा पाण्यापासून सुरक्षित राहतो. फोन का स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89.2 टक्के आहे. ओपो ए54 अँड्रॉइड 10 आधारित कलरओएस 7 वर लॉन्च केला गेला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकच्या हीलियो पी35 चिपसेटवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये आईएमजी जी8320 जीपीयू आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो ए54 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि तेवढाच अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची बोका लेंस आहे. सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डुअल सिम, 4जी वोएलटीई सोबतच पावर बॅकअपसाठी OPPO A54 मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

वेरिएंट व प्राइस

OPPO A54 भारतात तीन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या पहिल्या वेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 13,490 रुपये आहे. तसेच फोनचा दुसरा वेरिएंट 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज तर तिसरा वेरिएंट 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या दोन्ही वेरिएंट्सची किंमत क्रमश: 14,490 रुपये आणि 15,990 रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here