5,000mAh बॅटरी आणि 6GB रॅमसह लॉन्च होईल स्वस्त 5G फोन OPPO A74

भारतात Oppo F19 सीरीज 6 एप्रिलला लॉन्च केला जाईल. बातमी समोर येत आहे कि Oppo लवकरच एक स्वस्त 5जी मोबाईल Oppo A74 लॉन्च करणार आहे, ज्याबाबत माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी ओपो ए74 च्या फुल स्पेसिफिकेशनचा खुलासा झाला होता. आता लॉन्चच्यापूर्वी ओपो ए74 5G ची किंमत आणि फुल स्पेसिफिकेशनची माहिती समोर येत आहे. कंपनीने आतापर्यंत ओपो A74 5G च्या अधिकृत किंमत आणि लॉन्च डेटबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

OPPO A74 5G ची डिजाइन

रिटेल वेबसाइटवर ओपो A74 5G च्या फोटो नुसार डिवाइसच्या टॉपला डावीकडे होल-पंच असेल. तसेच, फोनमध्ये बॉटमला जाड बेजल दिसत आहेत. फोनच्या तिन्ही कडा खूप पातळ असल्याच्या दिसत आहेत. डिवाइसमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर पण आहे.

हे देखील वाचा : LG Mobile चे दुकान बंद, आता लॉन्च होणार नाहीत एलजीचे फोन! जाणून घ्या कारण

Oppo A74 5G
Oppo A74 5G

OPPO A74 5G ची किंमत

Oppo A74 5G एका ऑस्ट्रेलियन रिटेलरच्या वेबसाइट JB Hi-Fi वर लिस्ट केला गेला आहे. या वेबसाइटवर फोनच्या कलर आणि किंमतीची माहिती पण समोर आली आहे. लिस्टिंगनुसार फोन Fluid Black आणि Space Silver मध्ये स्पॉट केला गेला आहे. फोनच्या 6GB + 128GB वेरिएंटची किंमत AUD 444 (जवळपास 24,800 रुपये) आहे. लिस्टिंगमध्ये समोर आले आहे कि फोन 13 एप्रिलला लॉन्च केला जाईल.

Oppo A74 5G चे स्पेसिफिकेशन

JB Hi-Fi लिस्टिंग नुसार फोनमध्ये 6.5-inch full-HD+ (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले असेल जो 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. तसेच फोनमध्ये Qualcomm Snapdragon 480 SoC आणि 6GB रॅम व 128GB स्टोरेज असेल. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येईल.

Oppo A74 5G मध्ये क्वाड-रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. या सेटअपमध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8-मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आणि दोन 2-मेगापिक्सलचा सेंसरचा समावेश असेल. फ्रंटला डावीकडे 16-मेगापिक्सलचा सेंसर असेल.

हे देखील वाचा : Apple पण घेऊन येत आहे पंच-होल डिस्प्ले असलेला iPhone, जाणून घ्या नाव आणि कधी होईल लॉन्च हा फोन

ओपो A74 5G मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून वाय-फाय, ब्लूटूथ v5.1, जीपीएस आणि 3.5एमएम हेडफोन्स जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट असेल. तसेच, पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली जाईल. त्याचबरोबर OPPO A74 5G मध्ये ColorOS 11.1 बेस्ड Android 11 ऑपरेटिंग सिस्टम असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here