Xiaomi ला टक्कर देण्यासाठी येत आहे Oppo स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या कधी होणार आहे लॉन्च

स्मार्टफोन मार्केट मध्ये एकमेकांना टक्कर देत असतात आता कंपन्या TV मार्केट मध्ये पण एकमेकांना मागे टाकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या लिस्ट मध्ये आधीपासून शाओमी, रियलमी आणि वनप्लसचा समावेश आहे. यानंतर आता Oppo ने सांगतिले आहे कि ते पण लवकरच स्मार्ट टीव्ही सेगमेंट मध्ये येण्याची तयारी करत आहेत. अनेक दिवस याबाबत लीक समोर येत होते कि ओप्पो लवकरच टीव्ही सेगमेंट मध्ये एंट्री करेल. कंपनीने वीबो अकाउंट वर एक फोटो शेअर केला आहे. या फोटो मध्ये कंपनीचे अनेक प्रोडक्ट्स दिसत आहेत, ज्यात टीव्ही पण आहे.

माइक्रो ब्लॉगिंग साइट वीबो वर शेयर केल्या गेलेय या फोटो मध्ये टीव्ही बाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण असे समजले आहे कि कंपनी टीव्ही मार्केट मध्ये एंट्री करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तसेच कंपनी वीबो वर आपल्या प्रोडक्ट्सची यादी दिली आहे, ज्याच्या खाली टीव्ही दिसत आहे.

मार्च मध्ये ओप्पो चे वाइस प्रेसिडेंट Liu Bo यांनी सांगितले होते कि कंपनी लवकरच टीव्ही सेगमेंट मध्ये येणार आहे. तर वीबो वर लेटेस्ट पोस्ट मध्ये टीव्हीची एक झलक दिसली आहे. टीव्ही सोबत ते प्रोडक्ट आहेत जे लॉन्च केले गेले आहेत. यात Oppo Enco W51 true wireless earphones, Oppo Band इत्यादींचा समावेश.

कंपनी भारतात 17 जूनला आपली Find X2 सीरीज सादर करणार आहे. लॉन्च डेट समोर येण्याआधी काही दिवसांपूर्वी Oppo Find X2 अमेझॉन इंडिया वर दिसला होता. एका वेबसाइटला अमेझॉनच्या बॅकएंड डेटा मध्ये फोनच्या किंमतीची माहिती मिळाली होती. त्यानुसार Oppo फाइंड एक्स2 चा 12 जीबी रॅम व 256 जीबी मेमरी वेरिएंट 69,999 रुपयांमध्ये लिस्ट केला गेला होता. अधिकृतपणे फोनची किंमत 17 जूनला समोर येईल.

OPPO Find X2 चे स्पेसिफिकेशन्स

ओप्पो फाइंड एक्स2 मध्ये 6.7-इंचाचा एमोलेड डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 असलेला पॅनल आहे जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. एंडरॉयड 10 सह या फोन मध्ये पण क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर देण्यात आलेला आहे. फोन मध्ये 12GB रॅम सह 256GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. याची स्टोरेज वाढवता येत नाही. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी सुपर फास्ट 65 वॉट चार्जिंग आउटपुट सपोर्ट असलेली 4,200 एमएएच क्षमतेची बॅटरी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट पण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here