Oppo K11 चे स्पेसिफिकेशन्स आणि फोटो आले समोर, बेंचमार्किंग साइटवर दिसला फोन

Highlights

 • OPPO K11 100W फास्ट चार्जिंगसह दिसला आहे.
 • डिवाइस 12GB पर्यंत रॅमसह येऊ शकतो.
 • ह्यात 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो.

ओप्पो नवीन OPPO K11 स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. कंपनीनं कोणतीही घोषणा केली नाही परंतु अलीकडेच डिवाइस सर्टिफिकेशन साइट TENAA सह 3C वेबसाइटवर स्पॉट करण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनची इमेज देखील समोर आली आहे. पुढे तुम्ही सविस्तर माहिती वाचू शकता.

OPPO K11 लिस्टिंग डिटेल

 • 3C आणि TENAA सर्टिफिकेशनवर ओप्पो K11 स्मार्टफोन PJC110 मॉडेलसह दिसला आहे.
 • 3C लिस्टिंगमध्ये OPPO K11 100W फास्ट चार्जिंगसह दिसला आहे.
 • ह्यात कनेक्टिव्हिटीसाठी 5G सपोर्ट मिळेल असं सांगण्यात आलं आहे.
 • TENAA सर्टिफिकेशनवर समोर आलेल्या इमेजनुसार फोन एलईडी फ्लॅशसह ट्रिपल-कॅमेरा सेटअप मिळू शकतो.
 • TENAA मध्ये असं देखील दिसलं आहे की ह्यात फुल HD+ रिजॉल्यूशन असलेला 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. ज्यावर 120Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो.
 • प्रोसेसर पाहता लिस्टिंगमध्ये डिवाइस ऑक्टा-कोर 2.7GHz प्रोसेसरसह दाखवण्यात आला आहे. चिपसेट नाव तर समोर आलं नाही.
 • डिवाइस 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह येऊ शकतो.

OPPO K11 चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

 • डिस्प्ले : फोनमध्ये 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले फुल HD+ रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह मिळू शकतो. डिस्प्लेवर पंच होल डिजाइन दिली जाईल.
 • प्रोसेसर : स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर 2.7GHz प्रोसेसर असल्याचं सांगण्यात आलं आहे. जो स्नॅपड्रॅगन 782G चिपसेट असू शकतो.
 • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत लिस्टिंगमध्ये फोन तीन स्टोरेजमध्ये दिसला आहे ज्यात 6GB/8GB आणि 12GB रॅमसह 128GB/256GB आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळू शकते.
 • बॅटरी : ह्यात 5,000mAh ची मोठी बॅटरी मिळू शकते जी 100W फास्ट चार्जिंग देईल.
 • कॅमेरा : ओप्पो K11 मध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात ऑप्टिकल इमेज स्टेबिलायजेशनसह 50-मेगापिक्सलचा Sony IMX890 प्रायमरी सेन्सर मिळू शकतो. त्याचबरोबर 8MP ची सेकंडरी लेन्स आणि 2MP चा अजून सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ-कॉलिंगसाठी 16MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो.
 • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता फोन अँड्रॉइड 13 वर आधारित असेल.
 • अन्य : डिवाइसमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल-सिम कार्ड स्लॉट, ब्लूटूथ, यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here