22 मार्चला लॉन्च होईल पावरफुल फीचर्स असलेला OPPO Reno 5F, सॅमसंग आणि शाओमीला मिळेल आव्हान

OPPO लवकरच आपल्या पॉप्युलर स्मार्टफोन सीरीज Oppo Reno 5 मध्ये एक नवीन फोन सादर करणार आहे. हा नवीन डिवाइस 22 मार्चला Oppo Reno 5F नावाने मार्केट मध्ये सादर केला जाईल. ऑफिशियल होण्याआधी या फोनची वैशिष्टये आणि या फोनच्या लुकची माहिती समोर आली आहे. या फोनच्याआधी कंपनीने आपल्या रेनो 5 सीरीजमध्ये Oppo Reno 5 आणि Oppo Reno 5 Pro स्मार्टफोन्स सादर केले आहेत. (oppo reno 5f launch on march 22 with quad rear cameras 4310mah 30w fast charging)

कुठे होईल लॉन्च

ओपोने केन्या मध्ये आपल्या अधिकृत पेजवर या फोनची माहिती दिली आहे. यावरून स्पष्ट झाले आहे कि 22 मार्चला हा फोन केन्या मध्ये लॉन्च केला जाईल. दुसरीकडे बोलले जात आहे कि हा भारतात पण लॉन्च केला जाऊ शकतो. पण, याबाबत अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरी आणि 8GB रॅमसह लॉन्च झाला Realme चा स्वस्त आणि पावरफुल 5G फोन Narzo 30 Pro, होईल का Xiaomi ची सुट्टी

किंमत

Reno 5F कंपनीच्या साइटवर 23 फेब्रुवारीपासून 21 मार्चपर्यंत प्री-ऑर्डर करता येईल. प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना OPPO Enco W11 ईयरबड्स आणि 6 महिन्याचे स्क्रीन प्रोटेक्शन प्लान मोफत मिळेल. फोन सध्या केन्याच्या वेबसाइटवर KSh 31,999 (जवळपास 22,000 रुपये) मध्ये लिस्ट आहे. फोन दोन कलर Fluid black, आणि Fantastic Purple मध्ये सादर केला जाईल.

डिजाइन

OPPO Kenya वेबसाइटवर समोर आलेल्या टीजर पेज मध्ये फोनची जास्त माहिती देण्यात आली नाही. पण फोटो वरून स्पष्ट झाले आहे कि फोनच्या फ्रंटला पंच-होल असेल. तसेच, मागे क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाईल. फोटो मध्ये मागे कोणताही फिंगरप्रिंट स्कॅनर दिसत नाही. त्यामुळे बोलले जात आहे कि डिवाइस मध्ये इन-डिस्प्ले सेंसर असेल.

हे देखील वाचा : 50MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला पुस्तकाप्रमाणे घडी होणारा Huawei Mate X2 फोन, बदलेल का फोल्डेबल फोन्सची दुनिया

Reno 5F मध्ये काय असेल खास

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या फोनच्या मागील कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा असू शकतो. फोन मध्ये 8MP अल्ट्रा वाइड आणि डुअल 2MP सेंसर मॅक्रो आणि डेप्थसाठी असतील. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 32 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. इतकेच नव्हे तर बातमी अशी आहे कि Oppo Reno 5 F मध्ये 6.5 इंचाचा OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोन मध्ये 4,310mAh ची बॅटरी 30W VOOC 4.0 फास्ट चार्जिंगला सपोर्टसह दिली जाईल.

ओपो रेनो 5 प्रो 5जी व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here