5जी मध्ये ओपो ने मारली बाजी, दाखवला पहिला 5जी फोन

काही दिवसांपूर्वी क्वालकॉम 4जी/5जी समिट 2018 मध्ये ओपो ने आपल्या 5जी मॉडेलचे प्रदर्शन केले होते. या इवेंट मध्ये एक साथ अनेक कंपन्यांनी 2019 मध्ये आपले 5जी फोन आणणार असल्याची घोषणा केली होती ज्यात ओपो पण एक होती आणि आज ओपो ने आपल्या फोन मधील 5जी चे प्रदर्शन पण केले आहे. ओपो चा 5जी फोन पुढल्या वर्षी येणार असला तरी आता कंपनी ने डेमो दिला आहे. ओपो चे ग्लोबल वाइस प्रेसिडेंड आणि प्रेसिडेंट आॅफ चाइना बिजनेस डिपार्टमेंट ब्राइन शेन ने आपल्या सोशल अकाउंट वरून याची माहिती दिली आहे. तसेच कंपनी ने यासाठी प्रेस रिलीझ पण शेयर केली आहे.

5जी कने​क्टिविटी साठी कंपनी ने ओपो रिसर्च इंस्टिट्यूट मध्ये एक परिक्षण केले होते आणि यात कंपनी ने ओपो आर15 मॉडेलचा कस्टमाइज वर्जन ज्यात 5जी क्षमता होती त्यावर यशस्वी चाचणी केली आहे. लॅब टेस्टिंग मध्ये कंपनीने 5जी कम्पोनेंट्स जसे कि सिस्टमबोर्ड, आरएफ, आणि एफएफई इत्यादी फोनशी जोडून लाइव 5जी चे प्रदर्शन केले. यात फोनच्या स्क्रीन वर 5जी लोगो पण स्पष्टपणे दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी ओपो ने बिजींग 2018 क्वालकॉम चाइना टेक्नोलॉजी एंड कॉर्पोरेशन समिट मध्ये 5जी पायलट प्रोग्राम साठी क्वालकॉम सोबत हात मिळवणी केली होती. त्याचबरोबर कंपनी 5जी प्रोडक्ट डेवलप्मेंट मध्ये पण सहयोग करणार असल्याचे बोलले आहे.

विशेष म्हणजे ओपो 2015 पासूनच 5जी बद्दल खूप गंभीर आहे आणि कपंनीची रिसर्च आणि डेवलप्मेंट टीम ने याविषयी खूप काम केले आहे. कंपनीचा दावा आहे कि त्यांनी 5जी स्मार्टफोन बद्दल तयारी केली आहे जी इंटरनेशनल स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन 3जीपीपी च्या मानकांन नुसार आहे. आता पर्यंत 5जी बद्दल स​बमिट करण्यात आलेल्या डॉक्यूमेंट च्या बाबतीती ओपो सर्वात वर आहे.

गेल्याच वर्षी कपंनी ने 5डी स्ट्रक्चर लाइट आधारित 5जी वीडियो कॉलिंगची चाचणी केली होती आणि हँडसेट वरून टेस्ट करून ओपो इतर कंपन्यांपेक्षा खूप गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here