5000एमएएच बॅटरीसह लाँच झाला Vivo Y11 4G; जाणून घ्या किंमत

Highlights

  • विवो वाय11 चीनमध्ये सादर करण्यात आला आहे.
  • फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी आणि मीडियाटेक ऑक्ट-कोर प्रोसेसर आहे.
  • हा फोन obsidian black आणि ice blue कलरमध्ये येतो.

चीनी कंपनी Vivo नं साल 2014 मध्ये आपल्या वाय-सीरीजमध्ये विवो वाय11 सादर केला होता. त्यानंतर साल 2019 मध्ये हा डिवाइस नवीन स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह लाँच करण्यात आला. तर पुन्हा एकदा तीन वर्षांनी Vivo Y11 चा नवीन व्हर्जन वेगळ्या डिजाइन आणि हार्डवेयरसह चीनी मार्केटमध्ये आला आहे. डिवाइसची खासियत पाहता यात यात 5,000एमएएचची बॅटरी आणि मीडियाटेक ऑक्ट-कोर प्रोसेसर आहे. आणि याची किंमत 999 युआन म्हणून जवळपास 11,950 रुपये ठेवण्यात आली आहे.

अशी आहे फोनची नवी डिजाइन

या फोनची डिजाइन पाहता, हा हँडसेट वॉटरड्रॉप नॉचला सपोर्ट करतो. तसेच, फोनच्या मागे आयताकृती कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यात सर्कुल कॅमेरा डिजाइनमध्ये सिंगल कॅमेरा आणि एक एलईडी फ्लॅश आहे. त्याचबरोबर फोनच्या मागे आणि बाजूला मॅट फिनिश मिळतो. फोनच्या फ्रंटला तीन बाजूंना नगण्य बेजल्स आहेत आणि खालच्या बाजूला चीन आहे. फोन obsidian black आणि ice blue या दोन कलर ऑप्शनमध्ये येतो. हे देखील वाचा: चुकीच्या UPI ID वर पाठवले पैसे? अशाप्रकारे मिळवा रिफंड, जाणून घ्या प्रोसेस

Vivo Y11 चे स्पेसिफिकेशन्स

Y11 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.51-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे जो 1600 x 720 पिक्सल एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. तसेच फोनची स्क्रीन 60 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येते. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक Helio P35 प्रोसेसर देण्यात आला आहे. जोडीला फोनमध्ये 6GB पर्यंतच्या रॅमसह 128जीबीची स्टोरेज देण्यात आली आहे. डिवाइसची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते. हे देखील वाचा: 16जीबी रॅम आणि 50एमपी कॅमेरा! Infinix Hot 30 ची थायलँड मध्ये लाँच

फोनचे कॅमेरा स्पेक्स पाहता डिवाइसच्या मागे एक 8 मेगापिक्सल मेन कॅमेरा एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. तर, फ्रंटला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. जोडीला पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 10 वॉट चार्जिंग सपोर्टसह येते. यात मायक्रो-यूएसबी पोर्ट आहे. कंपनीचा दावा आहे की एकदा चार्ज केल्यावर हा फोन 28 दिवस स्टॅन्ड बाय टाइम देतो. Y11 4G स्मार्टफोन अँड्रॉइड 12 आधारित ओरिजिन ओएसवर चालतो. हा फोन कंपनीच्या चिनी वेबसाइटवर लिस्ट झाला आहे परंतु विवोनं फोनच्या उपलब्धतेची कोणतीही माहिती दिली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here