फक्त 6,999 रुपयांमध्ये Nokia C12 Pro लाँच; 7 हजारांच्या आत Realme आणि Redmi ला मिळणार टक्कर

Highlights

  • Nokia C12 Pro दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला.
  • हा फोन 2 वर्षांच्या सिक्योरिटी अपडेटसह आला आहे.
  • नोकिया सी12 प्रो Android 12 (Go edition) वर चालतो.

नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी HMD Global नं आज भारतीय बाजारात आणखी एक स्वस्त मोबाइल फोन आणला आहे. ‘सी’ सीरीज अंतगर्त नवीन स्मार्टफोन जोडत कंपनीनं Nokia C12 Pro भारतात लाँच केला आहे. एंट्री लेव्हल सेग्मेंटमध्ये आलेला हा एक स्वस्त स्मार्टफोन आहे ज्याची किंमत फक्त 6,999 रुपये आहे. या प्राइस बजेटमध्ये नोकिया सी12 प्रो Realme आणि Redmi ब्रँड समोर आव्हान सादर करू शकतो.

नोकिया सी12 प्रो प्राइस

Nokia C12 Pro भारतात दोन मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 2 जीबी रॅम देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 3 जीबी रॅमला सपोर्ट करतो. या दोन्ही मॉडेल्सची किंमत अनुक्रमे 6,999 रुपये आणि 7,499 रुपये आहे. दोन्ही व्हेरिएंट 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. नोकिया सी12 प्रो को मार्केटमध्ये Light Mint, Charcoal आणि Dark Cyan कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. हे देखील वाचा: 64MP Camera सह भारतात आला Realme C55, पाहा फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

नोकिया सी12 प्रो स्पेसिफिकेशन्स

नोकिया सी12 प्रो स्मार्टफोन 2GB Virtual RAM टेक्नॉलॉजीसह बाजारात आला आहे. फोनचे दोन्ही मेमरी व्हेरिएंट या टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतात, त्यामुळे बेस व्हेरिएंट 4 जीबी रॅमची पावर तर मोठा व्हेरिएंट 5 जीबी रॅमची परफॉर्मन्स देतो. हा फोन अँड्रॉइड 12 गो एडिशन वर लाँच करण्यात आला आहे जो फोन मेमरी, इंटरनेट डेटा आणि बॅटरीचा वापर कमी करतो. हे देखील वाचा: 16GB RAM सह iQOO Z7 5G भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

नोकिया सी12 प्रो मध्ये 6.3 इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खाली रुंद चिन पार्ट आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक आणि फ्रंट दोन्ही पॅनलवर सिंगल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हा नोकिया फोन 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर आणि 5 मेगापिक्सलच्या सेल्फी सेन्सरला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here