POCO F5 होणार आहे भारतात लाँच! स्पेसिफिकेशन्स आले समोर

Highlights

  • पोको इंडियाच्या कंट्री हेडनं POCO F5 चा लाँच टीज केला आहे.
  • गिकबेंचवर देखील हा एफ सीरिजचा फोन लिस्ट झाला आहे.
  • लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच होऊ शकतो.

POCO F5 आणि POCO F5 Pro बद्दल आतापर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती की भारतीय बाजारात पोको एफ5 लाँच होईल परंतु एफ5 प्रो येणार नाही. कंपनीच्या भारतीय अधिकाऱ्यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून हिंट दिली आहे की शाओमी सब-ब्रँड लवकरच आपल्या ‘एफ’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. तसेच आता हा मोबाइल फोन बेंचमार्किंग साइटवर देखील लिस्ट झाला आहे.

पोको इंडियाचे कंट्री हेड हिमांशु टंडन यांनी आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलच्या माध्यमातून POCO F5 लाँच टीज केला आहे. या ट्वीटमध्ये ‘Fa5t’ लिहिण्यात आलं आहे जो एफ5 कडे इशारा करतो. ताईच गीकबेंचवर हा मोबाइल Xiaomi 23049PCD8I मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे ज्यात ‘आय’ अल्फाबेट फोनच्या इंडियन मॉडेलसाठी आहे. या दोन्ही नवीन अपडेट्सनंतर अंदाज लावला जात आहे की कंपनी लवकरच भारतात हा स्मार्टफोन सादर करू शकते.

पोको एफ5 चे स्पेसिफिकेशन्स

  • Qualcomm Snapdragon 7+ Gen 2
  • Android 13
  • 8GB RAM

POCO F5 गीकबेंचवर क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 प्लस जेन 2 चिपसेटसह दाखवण्यात आला आहे ज्यात 2.92गीगाहर्ट्ज पर्यंतच्या क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसरचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या लिस्टिंगमध्ये फोनचा 8जीबी रॅम व्हेरिएंट देखील समोर आला आहे. गीकबेंचवर हा पोको फोन अँड्रॉइड 13 ओएससह दाखवण्यात आला आहे.

  • 6.67″ FHD+ Display
  • 120Hz Refresh Rate

फोनचे अन्य फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता POCO F5 स्मार्टफोन 6.67 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो जो फुलएचडी+ पिक्सल रिजोल्यूशनवर काम करेल. ही स्क्रीन पंच-होल स्टाईलसह येईल ज्यावर 120हर्ट्ज रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळू शकतो.

  • 64MP Triple camera
  • 16MP Selfie camera

POCO F5 मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. समोर आलेल्या माहितीनुसार फोनच्या बॅक पॅनलवर ओआयएस फीचर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो. जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर असू शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या पोको फोनमध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

  • 67W charging
  • 5,000mAh battery

बॅटरी सेग्मेंट पाहता पावर बॅकअपसाठी पोको एफ5 मध्ये 5,000एमएएच बॅटरी असल्याचं समोर आलं आहे. तसेच बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी हा मोबाइल फोन 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here