पोको घेऊन येत आहे नवीन स्मार्टफोन, Poco M6 Pro 5G ची चाहूल लागली

Highlights

  • Poco नं नवीन डिवाइसची घोषणा केली आहे.
  • कंपनीचे हेड हिमांशु टंडन यांनी स्वतः माहिती दिली आहे.
  • हा फोन Poco M6 Pro 5G असू शकतो.

भारतात 5G टेक्नॉलॉजी आल्यापासून नवीन फोन्स सतत लाँच होत आहेत. त्यात आता Poco ची भर पडली असून कंपनीनं नवीन डिवाइसची घोषणा केली आहे. कंपनीचे प्रमुख हिमांशु टंडन यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. त्यांनी स्मार्टफोनचं नाव सांगितलं नाही परंतु हा Poco M6 Pro 5G असू शकतो, अशी चर्चा टेक वर्तुळात सुरु झाली आहे.

कंपनी प्रमुखांनी केली घोषणा

पोकोच्या नवीन 6 सीरीज बद्दल कंपनीचे हेड हिमांशु टंडन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्वीट केलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की कंपनीनं आतापर्यंत Poco 5 सीरीज अंतगर्त अनेक स्मार्टफोन लाँच केले आहेत. त्यांचं यश पाहून नवीन 6 सीरीज आणली जाईल. पोस्टमध्ये त्यांनी कमिंग सून देखील लिहलं आहे, ज्याचा अर्हता असा की डिवाइसची एंट्री लवकरच केली जाऊ शकते.

Poco M6 Pro 5G नावानं येऊ शकतो फोन

पोको कंपनीच्या प्रमुखांनी नवीन डिवाइसच्या नावाचा खुलासा केला नाही. परंतु टिपस्टर Kacper Skrzypek च्या पोस्टनुसार हा डिवाइस Poco M6 Pro 5G असू शकतो जो भारतात लवकरच सादर केला जाऊ शकतो. अधिकृत घोषणेची काही दिवस वाट पाहावी लागेल.

Poco M6 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

डिस्प्ले : संभाव्य फीचर्स पाहता डिवाइसमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ह्यात 2460 x 1080 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 120hz रिफ्रेश रेट मिळू शकतो.

  • प्रोसेसर : फोनमध्ये परफॉर्मन्ससाठी ऑक्टा कोर प्रोसेसर देऊ शकते. परंतु चिपसेटचं नाव समजलं नाही.
  • स्टोरेज : हा फोन 2 स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. ज्यात 6GB, 8GB रॅम आणि 128GB, 256GB इंटरनल स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे.
  • कॅमेरा : डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो ह्यात 64 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी : फोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
  • OS : आगामी पोको फोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर चालू शकतो.
  • अन्य : मोबाइलमध्ये ड्युअल सिम 5G, वायफाय, ब्लूटूथ, फिंगरप्रिंट सेन्सर सारखे अनेक बेसिक फीचर दिले जाऊ शकतात.
  • LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here