चायनीज कंपनी Xiaomi पासून वेगळी झाल्यानंतर पोकोने भारतात कमी किंमतीत चांगले स्मार्टफोन्स लॉन्च करून बाजारात धुमाकूळ घातला आहे. टेक विश्वासोबतच फॅन्स पण पोकोच्या नवीन फोनची वाट बघत असतात. तेच पाहता यावर्षी पण कंपनी भारतीय बाजारात आपले अनेक नवीन आणि खास फोन्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अनेक दिवसांपासून बातमी समोर येत आहे कि कंपनी ग्लोबल मार्केट मध्ये सादर केलेला POCO M3 भारतात घेऊन येण्याची प्लानिंग करत आहे. आता हा फोन भारतीय लॉन्चच्या टाइमलाइन बद्दल माहिती समोर आली आहे.
टिपस्टर मुकुल शर्माने एक ट्वीटच्या माध्यमातून माहिती दिली आहे कि POCO M2 चा अपग्रेेडेड वर्जन फेब्रुवारी मध्ये भारतात लॉन्च केला जाईल. अचूक लॉन्चची तारीख स्पष्ट झाली नाही, पण असे वाटत आहे कि भारतात POCO M3 येण्याची जास्त वाट बघावी लागणार नाही. तसेच काही दिवसांपूर्वी POCO M3 स्मार्टफोनच्या इंडियन वेरिएंटला TUV Rheinland सर्टिफिकेशन मिळाले होते. सर्टिफिकेशन साइट वर फोन M2010J19CI मॉडेल नंबर सह स्पॉट केला गेला होता.
हे देखील वाचा : Exclusive : Mi 11 आणि Redmi Note 10 सीरीज येत आहे भारतात, बघा Xiaomi चा संपूर्ण प्लान
M3…..
DD/02/YYYY— Mukul Sharma (@stufflistings) January 19, 2021
स्पेसिफिकेशन्स
POCO M3 मध्ये 6.53 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे जो वॉटरड्रॉप नॉच डिजाइन वर बनला आहे. पोको एम3 चा हा डिस्प्ले 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. POCO M3 स्मार्टफोन अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला होता जो मीयुआय 12 सह चालतो. या फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे.
पोको एम3 मध्ये मागे ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा प्राइमरी कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे. दुसरीकडे फोनचे इतर दोन रियर कॅमेरा सेंसर पाहता यात 2 मेगापिक्सलचा दोन सेंसर आहे, त्यातील एक डेप्थ आणि एक मॅक्रो सेंसर आहे.
हे देखील वाचा : अमेझॉन – फ्लिपकार्ट वर ऑनलाईन शाॅपिंग करताना फसवणुकीपासून वाचवतील या 5 गोष्टी, मिळणार नाही धोका
POCO M3 मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. तसेच मोठी बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सह पण येईल.
किंमत
POCO M2 चा अपग्रेडेड रूप म्हणून POCO M3 गेल्या वर्षी जागतिक स्तरावर लॉन्च केला गेला होता. ग्लोबली Poco M3 चा 4 जीबी + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 149 डॉलर (जवळपास 11,500 रुपये ) आणि 4 जीबी + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 169 डॉलर (जवळपास 12,500 रुपये) मध्ये विकत घेता येईल. त्यामुळे आशा आहे कि भारतात पण फोन 11,000 रुपयांमध्ये सादर केला जाईल.
शाआोमी पोको एम3 व्हिडीओ