अमेझॉन – फ्लिपकार्ट वर ऑनलाईन शाॅपिंग करताना फसवणुकीपासून वाचवतील या 5 गोष्टी, मिळणार नाही धोका

लहानपणी शाळेत तुम्ही हि ओळ वाचली असेल, ‘भारत सणांचा देश आहे.’ आपल्या देशाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात कोणता ना कोणता सण व उत्सव साजरा होत असतो, मग तो धार्मिक असो वा राष्ट्रीय. मकर संक्रांती, बिहू व पोंगल झाले आहेत आणि आता प्रजासत्ताक दिवसाची तयारी सुरु आहे. अश्या सणांचा फायदा ऑनलाईन शाॅपिंग साइट्स पण मोठ्या खुबीने उचलतात आणि ‘फेस्टिवल सेल’ आयोजित करतात. ई-काॅमर्स साइट अमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्टने पण ‘रिपब्लिक सेल’ ची सुरवात केली आहे कि ज्यात आकर्षक ऑफर दिल्या जात आहेत. अनेक लोक या सेल मध्ये नवीन प्रोडक्ट विकत घेण्याची योजना बनवत आहेत. पण या ऑनलाईन खरेदीच्या आधी काही अश्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे, नाही तर तुमची मोठी फसवणूक पण होऊ शकते.

ऑफर समजून घ्या

शाॅपिंग साइटचे होम पेज ओपन करताच समोर येतो 80 टक्के पर्यंतचा डिस्काउंट किंवा 15,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक. अश्या ओळी वाचून लोक उत्साहित होतात आणि लवकरात लवकर ते सामान विकत घेण्याचा प्रयत्न करतात. पण इथे ‘UP To’ वर लक्ष न देणे मोठे नुकसानदायक ठरू शकते. अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वर अशाप्रकारची शाॅपिंग करताना कोणताही प्रोडक्ट ‘कार्ट’ मध्ये टाकण्याच्या आधी त्यावर मिळणारी ऑफर नीट समजून घेणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या बॅंक कार्ड, वाॅलेट व यूपीआई पेमेंट वर वेगवेगळ्या बेनिफिट मिळतात, त्यामुळे खरेदीच्या आधी या सर्व ऑफर्स नीट तपासून घ्या मग पुढे जा.

टर्म अँड कंडीशन्स ओळखा

मोठा डिस्काउंट किंवा कॅशबॅक बघून लोक शाॅपिंग सुरु तर करतात पण त्या बेनिफिटसाठी आवश्यक ‘Terms & Conditions’ कडे दुर्लक्ष करतात, ज्याचे दुष्परिणाम नंतर भोगावे लागतात. उदाहरणार्थ अमेझॉन यूपीआय पासून पेमेंट केले तर 20 टक्के कॅशबॅक मिळत आहे आणि त्याची एक कंडिशन अशी आहे कि, यूपीआय आयडी मॅन्युअली सब्मिट करायची नाही. त्याचप्रमाणे एक्सचेंज ऑफर मध्ये कोणताही जुना फोन 8,000 रुपयांमध्ये जात असेल पण त्याची कंडिशन आहे कि बाॅडी वर डेंट नसावा, आणि जर असे असले तर 8,000 रुपये मिळणार नाहीत. त्याचप्रमाणे अनेक टर्म अँड कंडीशन्स ऑनलाईन शाॅपिंग मध्ये प्रकाशित केल्या जातात ज्या शाॅपिंगच्या आधी बारकाईने वाचणे आणि समजणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा : 2021 मध्ये Nokia च्या 5G फोन्सचा धुमाकूळ, इथे बघा लिस्ट

सूट आणि डिस्काउंट किती योग्य, किती चुकीची

ऑनलाईन सेल मध्ये सर्वात जास्त कोणती गोष्ट आकर्षित करते तर ती असते डिस्काउंट. अमेझॉन असो वा फ्लिपकार्ट, या शाॅपिंग साइट्स वर कोणताही प्रोडक्ट जुन्या किंमतीत दाखवला जातो आणि त्यानंतर त्या सोबत प्रोडक्ट वर मिळणारी सूट आणि नंतर डिस्काउंट नंतरची किंमत. उदाहरणार्थ एखाद्या प्रोडक्टची वास्तविक किंमत 20,000 सांगण्यात आली आहे आणि त्यावर 5,000 रुपयांची सूट दिल्यानंतर सेल प्राइस 15,000 सांगण्यात आली आहे. पण लक्ष देण्याची बाब म्हणजे खरच त्या प्रोडक्टची किंमत 20,000 रुपयेच आहे का. अश्यावेळी लोकांचे लक्ष फक्त 5,000 रुपयांची डिस्काउंट वर जाते आणि त्या प्रोडक्टची खरी किंमत चेकच केली जात नाही. कदाचित त्या प्रोडक्टची खाती किंमत 15,600 रुपये असावी 20,000 रुपये नाही. त्यामुळे इतर वेबसाइट्स व मार्केट प्लॅटफॉर्म वर त्या प्रोडक्टची खरी किंमत पण तपासून पहा.

सेलर कोण आहे

चला तर थेट स्मार्टफोन विकत घेण्याचे उदाहरण घेऊन बोलूया. समजा तुम्हाला Apple किंवा Samsung चा एखादा नवीन मोबाईल फोन विकत घ्यायचा आहे. तुम्ही फोनची मिळत असलेली ऑफर आणि डिस्काउंट वाचता, पण यावर लक्ष देत नाही कि तो फोन कोण विकत आहे. ऑनलाईन शाॅपिंग सेल मध्ये Apple चा फोन आहे ऍप्पल विकत नाही आणि सॅमसंग फोन असेल तर Samsung च विकत नाही. अमेझॉन व फ्लिपकार्ट सारख्या शाॅपिंग साइट्स वर थेट कंपनी आपले सामान विकत नाही तर प्रोडक्ट विकणारे ‘Seller’ वेगळे असतात. त्यामुळे फक्त मोबाईल फोनच नाही तर इतर सामान विकत घेण्याआधी नीट बघून घ्या कि सेलर कोण आहे. त्या सेलरसाठी काही रिव्यू व फीडबॅक पण असेल तो वाचून घ्या.

हे देखील वाचा : TV स्क्रीन वर दिसणाऱ्या या नंबर्स मागे कोणते कारण आहे, जाणून घ्या का हे घालवतात टीव्ही बघण्याची मजा

पेमेंट करा सिक्योर

सामान 500 रुपयांचे असो वा 50,000 चे. ऑनलाईन शाॅपिंग करताना याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे कि तुमच्याद्वारे केलेले पेमेंट पूर्णपणे सिक्योर असेल. बॅंक कार्ड्स, यूपीआय आयडी आणि वाॅलेट इत्यादी पूर्णपणे सुरक्षित ठेवा आणि तुमची खाजगी माहिती कोणाकडे शेयर करू नका. जर तुम्ही कॅश-ऑन-डिलिव्हरी अंतगर्त सामान विकत घेतले असेल तर डिलिव्हरीवाल्याला पण पेमेंट करताना आपले बॅंकिंग डिटेल देऊ नका. जर तुम्हाला पेमेंट रिक्वेस्ट आली असेल ती घाईत एक्सेप्ट करू नका एकदा अमाउंट पण चेक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here