Realme Narzo 70 Pro 5G चे भारतातील लाँच पहा येथे लाईव्ह, अ‍ॅडव्हान्स फिचर्ससह येईल हा फोन

Realme Narzo 70 Pro 5G 19 मार्चला भारतात लाँच होणार आहे. हा एक मिडबजेट स्मार्टफोन असेल जो 20 हजार रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध होऊ शकतो. अनेक अ‍ॅडव्हान्स फिचर्स तसेच जबरदस्त स्पेसिफिकेशनसह या मोबाईल फोनमध्ये जर तुम्हाला पण याफोनबाबत जाणून घ्यायचे असेल तर पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून नारजो 70 प्रो 5जी चे भारतातील लाँच लाईव्ह पाहू शकता.

येथे पहा Narzo 70 Pro 5G चे भारतातील लाँच लाईव्ह :

Realme Narzo 70 Pro 5G ची भारतातील लाँचची माहिती

रियलमी कंपनी येत्या 19 मार्चला भारतात आपला हा नवीन मोबाईल फोन घेऊन येणार आहे. नारजो 70 प्रो 5जी फोनच्या लाँचचा कार्यक्रम 19 मार्चला दुपारी 12 वाजता सुरु होईल. Narzo 70 Pro 5G भारतातील लाँचला कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहिले जाऊ शकते. तसेच शॉपिंग साईट Amazon वर पण या फोनचे प्रोडक्ट पेज लाईव्ह करण्यात आले आहे. या अ‍ॅमेझॉन लिस्टिंगनुसार या फोनची सेल या ई-कॉमर्स साईटवर असणार आहे.

Realme Narzo 70 Pro 5G किंमतीची रेंज (लीक)

नारजो 70 प्रो 5जी फोनचे बजेट पाहता अलीकडेच समोर आलेल्या लीकमध्ये अंदाज लावला जात आहे की रियलमी आपल्या या नवीन मोबाईल फोनला मिड बजेटमध्ये घेऊन येणार आहे, तसेच फोनची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असणार आहे. या किंमतीच्या रेंजमध्ये Realme Narzo 70 Pro 5G टक्कर iQOO Z9 5G सोबत असल्याचे सांगितले जात आहे. हा नवीन आयकू मोबाईल 19,999 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत भारतात लाँच झाला आहे.

Realme Narzo 70 Pro 5G फिचर्स

  • 50MP IMX890 OIS Camera
  • 67W Fast Charging
  • 120Hz OLED Display
  • Air Gestures

कॅमेरा : रियलमी नारजो 70 प्रो 5जी ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. लीकमध्ये सांगण्यात आले आहे या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल मेन लेन्स दिली जाईल जो सोनी आयएमएक्स 890 सेन्सर असेल तसेच ओआयएस टेक्नोलॉजीसह असणार आहे.

स्क्रीन : नवीन नारजो फोन पंच-होल स्टाईल असणाऱ्या स्क्रीनवर लाँच केला जाईल. ही स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे, जी 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या डिस्प्लेवर 2000 निट्स ब्राइटनेस पण मिळणार आहे.

चार्जिंग : सध्या फोनमध्ये किती एमएएचची बॅटरी दिली जाईल, ही गोष्ट माहिती नाही, परंतु कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, Narzo 70 Pro 5G 67वॉट
फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसह असणार आहे.

एअर जेस्चर : कंपनी Air Gesture फिचरला प्रथम टिझ करत आहे. तसेच या टेक्नोलॉजीमुळे फोनला हात न लावता त्याच्या स्क्रीन व अ‍ॅप्सला नेविगेट करू शकता. अ‍ॅप्स चालू करणे-बंद करणे, स्क्रीन स्क्रॉलिंग, स्क्रीनशॉट, होम पेज अ‍ॅक्सेस सारखे काम फक्त इशारा करून होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here