वॉटरड्रॉप डिस्प्ले सह 27 सप्टेंबरला लॉन्च होईल रियलमी 2, कंपनी ने केला वीडियो टीजर शेयर

रियलमी ने गेल्या आठवड्यात आॅफिशियल ट्वीट करून सांगितले की कंपनी आपला नवीन स्मार्टफोन रियलमी 2 प्रो येत्या 27 सप्टेंबरला भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. जरी रियलमी ने सरळ फोन चे नाव सांगितले नसले तर निश्चित आहे की कंपनीचा आगामी फोन रियलमी 2 प्रो नावाने लॉन्च होईल. रियलमी 2 प्रो संबंधीत अजून महत्वाची माहिती देत रियलमी इंडिया ने आता एक वीडियो शेयर केला आहे, ज्यातून फोनच्या वॉटरड्रॉप डिस्प्ले सह लुक व डिजाईन ची माहिती मिळाली आहे.

रियलमी इंडिया ने 1 मिनट 09 सेेकेंड्स चा एक वीडियो शेयर केला आहे आणि या वीडियो मध्ये रियलमी 2 प्रो स्मार्टफोन दाखवण्यात आला आहे. रियलमी 2 कंपनी चा पहिला नॉच डिस्प्ले असलेला फोन होता तर रियलमी 2 प्रो ला रियलमी इंडिया आपला पहिला ‘वी’ शेप म्हणजे वॉटरड्रॉप ​नॉच डिस्प्ले वाला फोन म्हणून सादर करेल. फोनचा फ्रंट पॅनल पूर्णपणे बेजल लेस आहे डिस्प्ले च्या खाली थोडे बेजल्स आहेत.

रियलमी 2 प्रो च्या बॅक पॅनल वर रियलमी 2 प्रमाणे डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला जो एलईडी फ्लॅशला सपोर्ट करतो. रियलमी 2 च्या बॅक पॅनल वर ओवल शेप मध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच रियलमी 2 प्रो चा रियर फिंगरप्रिंट सेंसर राउंड शेप मध्ये दिसला आहे. फोनच्या उजवीकडच्या पॅनल वर पावर बटन आहे तसेच डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर देण्यात आले आहेत. यूएसबी पोर्ट आणि स्पीकर फोन खालच्या बाजूला आहेत.

रियलमी 2 प्रो बद्दल कंपनी चे सीईओ माधव सेठी ने 91मोबाईल्सला सांगितले आहे की रियलमी 2 प्रो कंपनी 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च करेल. आशा आहे की रियलमी 2 प्रो मध्ये 6जीबी रॅम दिला जाऊ शकतो तसेच हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 600 सीरीज मधील चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. हा फोन पण बेजल लेस नॉच डिस्प्ले वाला असेल आणि डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

रियलमी 2 किंमत पाहता देशात हा फोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 8,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे तसेच फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. रियलमी 2 देशात शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध आहे. रियलमी 2 चे फुल स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here