31 जुलैला लॉन्च होईल 8जीबी रॅम आणि 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Vivo Z5

Vivo बद्दल कालच एक माहिती समोर आली होती ज्यात कंपनीचा एक आगामी स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट झाला होता. गीकबेंच वर हा फोन V1921A मॉडेल नंबर सह लिस्टकेला गेला होता. या मॉडेल नंबर सह हा स्मार्टफोन याआधी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर पण लिस्ट झाला आहे. तर आज पुन्हा याच स्मार्टफोन संबंधित एक नवीन बातमी समोर आली आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि Vivo V1921A मॉडेल नंबर असलेला स्मार्टफोन Vivo Z5 नावाने टेक मंचावर सादर केला जाईल आणि हा फोन येत्या 31 जुलैला बाजारात येईल.

Vivo Z5 च्या लॉन्च संबंधित बातमी चीन मधून आली आहे. मीडिया रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी येत्या 31 जुलैला चीन मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून Vivo Z5 सादर केला जाईल. Vivo Z5 ची टीजर ईमेज पण चीन मध्ये शेयर करण्यात आली आहे ज्यात लॉन्च डेट 31 जुलैचा खुलासा झाला आहे. रिपोर्ट्स नुसार Vivo Z5 तोच स्मार्टफोन आहे जो गेल्या काही दिवसांत Vivo V1921A मॉडेल नंबर सह समोर आला होता.

हे देखील वाचा: 4,500एमएएच बॅटरी, तीन रियर कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा सह आला Vivo S1 चा ग्लोबल वेरिएंट, जाणून घ्या किंमत

Vivo Z5

आतापर्यंत समोर आलेल्या Vivo V1921A च्या लिस्टिंग नुसार Vivo Z5 कंपनी द्वारा 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.38-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नोलॉजी सह बाजारात येईल. लिस्टिंग नुसार Vivo Z5 एंडरॉयड 9 पाई सह फनटच ओएस 9.0 वर चालेल.

Vivo Z5 बद्दल बोलले जात आहे कि हा फोन 8जीबी रॅम आणि 6जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो तसेच फोन मध्ये 64जीबी मेमरी, 128जीबी मेमरी आणि 256जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. लिस्टिंग मध्ये फोनच्या चिपसेटची माहिती तर समोर आली नाही पण असे समजले आहे कि Vivo Z5 मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला आक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल.

हे देखील वाचा: Xiaomi चा मास्टर स्ट्रोक, भारतात लॉन्च झाले फ्लॅगशिप किलर Redmi K20 आणि K20 Pro

फोटोग्राफी साठी वीवोच्या या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. टेना नुसार Vivo V1921A मॉडेल नंबर वाला फोन म्हणजे Vivo Z5 मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर मिळेल तसेच बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर आणि 2-मेगापिक्सलची तिसरी लेंस दिली जाऊ शकतो. त्याचबरोबर सेल्फी साठी Vivo Z5 मध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. सांगण्यात आले आहे कि या फोन मध्ये गूगल असिस्टेंट बटण दिला जाईल. तसेच पावर बॅकअप साठी Vivo Z5 मध्ये 22.5वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेलली 4,420एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

वीवो झेड1 प्रो वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here