120Hz डिस्प्ले असलेल्या Realme Narzo 30 5G सीरीजच्या लॉन्च डेटचा झाला खुलासा, जाणून घ्या कधी करेल भारतात एंट्री

काही दिवसांपासून माहिती समोर येत आहे कि Realme आपल्या ‘नारजो’ सीरीजचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे. यावेळी कंपनी आपले नारजो फोन्सच्या कॅटेगरी मध्ये Realme Narzo 30 लाॅन्च करेल. अलीकडेच रियलमी कम्यूनिटी वेबसाइटवर रियलमी नारजो 30 च्या रिटेल बाॅक्सचे फोटोज शेयर करण्यात आले होते, त्यानंतर या सीरीजचा एक फोन Narzo 30 Pro स्मार्टफोन सर्टिफिकेशन्स साइट टेनावर पण स्पॉट केला गेला होता. आता टेक वेबसाइट MySmartPrice च्या रिपोर्ट मध्ये माहिती देण्यात आली आहे कि Realme Narzo 30 सीरीज फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात 21 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारी दरम्यान लॉन्च केली जाऊ शकते.

पोस्टर आला समोर

अलीकडेच एका टिप्सटरने ट्विट करून रियलमी नारजोचा एक रिटेल पोस्टर शेयर केला आहे. या पोस्टरनुसार Narzo 30 Pro मध्ये MediaTek Dimensity 800U SoC दिला जाईल जो 5G नेटवर्कला सपोर्ट करतो. तसेच सांगण्यात आले आहे कि Narzo 30 Pro मध्ये 120Hz डिस्प्ले दिला जाईल. आम्हाला आशा आहे कि फोनमध्ये एलसीडी पॅनलचा वापर केला जाऊ शकतो. डिवाइसच्या फ्रंटला टॉप-लेफ्ट कॉर्नरवर पंचहोल असेल. तसेच, डिवाइस मध्ये मागे आयताकृती कॅमेरा मॉड्यूल असेल. पोस्टरमध्ये कॅमेरा डिटेलची माहिती देण्यात आली नाही.

हे देखील वाचा : Realme ने केली कमाल, लॉन्च केला 14,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G फोन, यात आहे 4GB रॅम आणि 5,000mAh बॅटरी

तसेच स्टॅंडर्ड Narzo 30A च्या मागे चौकनी कॅमेरा मॉड्यूल असेल. त्याचबरोबर मागे माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाईल. पोस्टरमध्ये फक्त दोन फोनबद्दल सांगण्यात आले आहे. पण, काही रिपोर्ट्सनुसार फोनचे तीन मॉडेल्स सादर केले जातील.

Realme Narzo 30 सीरीज मध्ये असतील 3 मॉडेल्स

काही रिपोर्ट्सनुसार रियलमी नारजो 30 सीरीज मध्ये रेगुलर Realme Narzo 30 सह Realme Narzo 30 Pro आणि Realme Narzro 30A स्मार्टफोनचा समावेश असू शकतो. रियलमी कथितरित्या नार्जो 30 लाइनअपसह काही गेमिंग ऍक्सेसरीज पण आणण्याची योजना बनवत आहे.

रिटेल बॉक्सपण झाला लीक

काही आठवड्यांपूर्वी Realme India चे सीईओ माधव सेठ यांनी माहिती दिली होती कि त्यांचा नवीन 5जी फोन भारतात लॉन्च केला जाईल. कंपनीने काही दिवसांपूर्वी नार्जो 30 च्या रीटेल बॉक्सचे काही डिजाइनपण युजर्सच्या समोर सादर केल्या होत्या. त्यानंतर युजर्सना आवडलेल्या रिटेल बॉक्सच्या फोटोसह माधव सेठ यांनी ट्विट करून हिंट दिली कि रियलमी नारजो 30 लवकरच लॉन्च केला जाईल.

हे देखील वाचा : काहीशी अशी असेल रियलमीच्या आगामी ताकदवान फ्लॅगशिप फोन Realme Race ची डिजाइन

5G सपोर्ट

माधव सेठ यांनी रिटेल बॉक्स फोटो शेयर केल्यानंतर स्पष्ट झाले आहे कि नवीन सीरीज मध्ये 5G सपोर्ट असेल. पण, बोलले जात आहे कि Realme Narzo 30 सीरीजचा एक मॉडेल 5जी सपोर्टसह येईल. हा Realme Narzo 30 Pro असू शकतो.

गेमिंग मध्ये असेल दमदार

अलीकडेच माधव सेठ यांनी ट्विट करून नारजो 30 सीरीज गेमिंग सेंट्रिक फोन्सच्या रूपात सादर केली जाईल असे सुचवले होते.फोनमधील फीचर्सबद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आली नाही. पण, काही दिवसांपूर्वी टेनावर फोनचे काही फीचर्स समोर आले होते.

स्पेसिफिकेशन्स

अलीकडेच एक रियलमी फोन मॉडेल नंबर RMX3161 सह चीनी सर्टिफिकेशन साइट TENAA वर लिस्ट केला गेला होता. तेव्हा बोलले जात होते कि हा Realme Narzo 30 Pro फोन असेल. असे बोलले जात आहे कि फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि 6.5 इंच डिस्प्ले दिला जाईल. या सर्टिफिकेशन्स साइटवर फोनचे डायमेंशन 162.5 x 74.8 x 8.8एमएम असल्याचे सांगण्यात आले आहे. रियलमीचा हा आगामी स्मार्टफोन अँड्रॉइड 11 सह वेबसाइटवर लिस्ट झाला आहे त्याचबरोबर फोन मध्ये रियलमी युआय देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,880एमएएचची बॅटरी असल्याचे पण समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here