Vivo X90 आणि Vivo X90 Pro ची लाँच डेट लीक; Dimensity 9200 असलेले फोन लवकरच येऊ शकतात भारतात

Highlights

  • Vivo X90 सीरिजच्या भारतीय लाँचची तारीख प्राइसबाबानं रिपोर्ट केली आहे.
  • विवोचे फ्लॅगशिप स्मार्टफोन 26 एप्रिलला देशात लाँच होऊ शकतात.
  • Dimensity 9200 चिपसेट वापरणारे Vivo X90 आणि Vivo X90 Pro जगातील पहिले फोन्स

Vivo X90 सीरिज चीन आणि जागतिक बाजारात लाँच केल्यानंतर चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी विवो आता हे फोन्स भारतात आणण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. प्राइसबाबानं एका एक्सक्लुसिव्ह रिपोर्टमध्ये टिपस्टर योगेश ब्रारच्या हवाल्याने विवो एक्स 90 सीरिजच्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे. तुम्हाला माहिती असेल की Vivo X90+ हा पहिला स्मार्टफोन होता ज्यात क्वॉलकॉमचा Snapdragon 8 Gen2 चिपसेट वापरण्यात आला होता. तर MediaTek Dimensity 9200 चिपसेटसह येणारे Vivo X90 आणि Vivo X90 Pro हे पहिले फोन आहेत, जे 26 एप्रिलला भारतात येऊ शकतात.

विवो एक्स90 सीरिजची भारतीय लाँच डेट (संभाव्य)

रिपोर्ट्सनुसार Vivo X90 सीरिज भारतात 26 एप्रिलला लाँच केली जाऊ शकते. याचा अर्थ असा की या सीरिजची अधिकृत घोषणा याच महिन्यात केली जाऊ शकते. जागतिक लाँच प्रमाणे भारतात देखील Vivo X90 आणि Vivo X90 Pro येतील अशी अपेक्षा आहे. तसेच ग्लोबल लाँचमुळे या फोन्सच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती सहज उपलब्ध झाली आहे. हे देखील वाचा: POCO C51 फोन भारतात लाँच; फोनमध्ये 8MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

Vivo X90 आणि X90 Pro चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.78″ FHD+ OLED display
  • 12GB RAM + 256GB storage
  • MediaTek Dimensity 9200
  • 32MP Selfie Camera
  • 120W Fast Charging

विवो एक्स90 आणि एक्स90 प्रो 2800 × 1260 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाले आहेत. ही Q9 Ultra-Vision AMOLED पॅनल स्क्रीन आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. दोन्ही स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतात तसेच 1300निट्स ब्राइटनेस व 2160हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग सारख्या फीचर्सना सपोर्ट करतात.

दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला मीडियाटेक डिमेनसिटी 9200 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.05गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. अँड्रॉइड 13 सह एक्स90 मध्ये फनटचओएस 13 देण्यात आला आहे तर एक्स90 प्रो ओरिजनओएस 3 वर चालतो. हे विवो स्मार्टफोन 12GB LPDDR5 RAM आणि 256GB UFS 4.0 storage ला सपोर्ट करतात.

Vivo X90 आणि X90 Pro स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. रियर कॅमेरा सेटअप पाहता एक्स90 मध्ये 50MP IMX866 प्रायमरी सेन्सरसह 12MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 12MP ची पोर्टरेट लेन्स देण्यात आली आहे. तर एक्स90 प्रो 50MP IMX989 सेन्सरसह 12MP IMX663 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP IMX758 पोर्टरेट लेन्सला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Vi ने लाँच केला 599 रुपयांचा प्लॅन! 110GB डेटासह अनलिमिटेड कॉल्स आणि ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस

दोन्ही विवो स्मार्टफोन 5G SA/ NSA आणि Dual 4G VoLTE ला सपोर्ट करतात. पावर बॅकअपसाठी Vivo X90 मध्ये 4,810एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तर Vivo X90 Pro स्मार्टफोन 4,870एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. दोन्ही मोबाइल फोन्स 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतात तसेच कंपनीनं आपला प्रो मॉडेल 50वॉट वायरलेस चार्जिंगसह सादर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here