Realme Q मध्ये असेल 20W VOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट असेलेली 4,035एमएएच ची बॅटरी, 5 सप्टेंबरला होईल लॉन्च

Realme ने घोषणा केली आहे कि कपंनी येत्या 5 सप्टेंबरला आपल्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये ‘Realme Q’ सीरीज सुरु करणार आहे. कपंनीने लॉन्च डेट सोबतच सीरीजच्या स्मार्टफोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती पण दिली आहे. काही दिवसांपूर्वी पोस्टर्स मधून Realme Q सीरीज मधील चिपसेट आणि कॅमेरा सेटअपची माहिती देण्यात आली होती तर आता Realme च्या अधिकाऱ्यांनी Realme Q चे बॅटरी डिटेल पण सार्वजनिक केले आहेत.

Realme चायनाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर (CMO), Xu Qi Chase यांनी चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट शेयर करत सांगितले आहे कि 5 सप्टेंबरला लॉन्च होणाऱ्या Realme Q स्मार्टफोन मध्ये 4,035एमएएच ची मोठी बॅटरी दिली जाईल. पावरफुल असण्यासोबतच स्मार्टफोन बॅटरी 20W VOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करेल, ज्यामुळे काही मिनिटांतच फोनची बॅटरी फुल चार्ज करता येईल.

विशेष म्हणजे Realme Q Series 5 सप्टेंबरला कंपनी 4 नवीन प्रोडक्ट लॉन्च करेल. या डिवाईसेजची नावे अजूनतरी समोर आले नाहीत पण Realme ने दिलेल्या माहिती नुसार यातील एका प्रोडक्ट मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 712 चिपसेट मिळेल. त्याचबरोबर या डिवाईसच्या बॅक पॅनल वर 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर दिला जाईल. आशा आहे कि हा Sony IMX586 सेंसर असेल जो क्चॉड कॅमेरा सेटअप मध्ये येईल. असे बोलले जात आहे कि Realme आपली नवीन ऑपरेटिंग सिस्टम आणण्याची योजना बनवत आहे आणि Realme Q ओएस सह येणारा पहिला प्रोडक्ट असू शकतो.

Realme 5 Pro

Realme 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा Realme 5 पेक्षा वेगळा आहे. यात 6.3-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन क्वॉलकॉम 712 स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येतो. हँडसेट कंपनीने तीन रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे, ज्यात 4+64GB, 6+64GB, 8+128GB वेरिएंटचा समावेश आहे.

फोटोग्राफी साठी Realme 5 Pro मध्ये पण चार सेंसर आहेत. यात 48+8+2+2एमपी कॅमेऱ्यांचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. फ्रंटला सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये VOOC फ्लॅश चार्ज 3.0 सह 4,035mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच डिवाइस एंडरॉयड 9.0 पाई सह कलरओएस 6.0 वर चालतो.

Realme 5

स्पेसिफिकेशन्स पाहता Realme 5 मध्ये 6.5-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन क्वॉलकॉम 665 स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येतो. हँडसेट कंपनीने दोन रॅम व तीन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे, ज्यात 3+32GB, 4+64GB, 4+128GB वेरिएंटचा समावेश आहे.

फोटोग्राफी साठी Realme 5 च्या मागे चार सेंसर आहेत. यात 12+8+2+2एमपी कॅमेऱ्याचा कॉम्बिनेशन देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे डिवाइस एंडरॉयड 9.0 पाई सह कलरओएस 6.0 वर चालतो.

रियलमी 5 प्रो वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here