6,000mAh बॅटरी आणि 6GB RAM असलेला हा स्वस्त फोन Xiaomi-Realme ला टक्कर देण्यास भारतात झाला लॉन्च

Infinix Hot 10S

Infinix ने गेल्याच महिन्यात सांगितले होते कि कंपनी भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘हॉट’ सीरीजमध्ये नवीन मोबाईल फोन लॉन्च करेल. अलीकडेच कंपनीने या फोनचे नाव सांगितले होते तर आज Infinix Hot 10S स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. ब्रँडच्या इतर फोन्सप्रमाणे इनफिनिक्स हॉट 10एस पण लो बजेटमध्ये आला आहे जो 6,000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि मोठ्या डिस्प्लेसह मीडियाटेकच्या हीलियो जी85 चिपसेटवर चालतो. (Infinix Hot 10S launch in India with 6000mah battery 6gb ram g85 soc Price Specs Sale offer)

Infinix Hot 10S चा डिस्प्ले

इनफिनिक्स हॉट 10एस कंपनीने 20.5:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला आहे जो 720 X 1640 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.82 इंचाच्या एचडी+ आयपीएस एलसीडी ड्रॉपनॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबतच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.66 टक्के आहे तसेच हा डिस्प्ले 440निट्स ब्राइटनेस, 1500:1 कॉट्रास्ट रेशियो आणि आयकेयर मोडसह येतो.

Infinix Hot 10S

Infinix Hot 10S ची प्रोसेसिंग

इनफिनिक्स हॉट 10एस अँड्रॉइड 11 ओएसवर लॉन्च केला गेला आहे जो एक्सओएस 7.6 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या 64बिट आक्टाकोर प्रोसेसरसह 12नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी85 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन माली-जी52 जीपीयूला सपोर्ट करतो. इनफिनिक्सने आपला फोन Dar-link गेम बूस्ट टेक्नोलॉजीसह बाजारात आणला आहे.

हे देखील वाचा : Samsung चा कमी किंमत असलेला मास्टर स्ट्रोक, लॉन्च केला 8GB रॅम आणि 4,500mAh बॅटरी असलेला Galaxy F52 5G

Infinix Hot 10S चा रॅम व स्टोरेज

भारतात Infinix Hot 10S दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा छोटा वेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर मोठ्या वेरिएंटमध्ये 6 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्समध्ये इंटरनल मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येते.

Infinix hot 10s

Infinix Hot 10S चा कॅमेरा

इनफिनिक्स हॉट 10एस कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपवर लॉन्च केला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड एलईडी फ्लॅशसह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आणि थर्ड आर्टिफिशियल इंटेलिजेंस सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये डुअल एलईडी फ्लॅशसह एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा :

Infinix Hot 10S ची बॅटरी

मोठा डिस्प्ले आणि गेमिंग पावरमुळे इनफिनिक्सने आपला फोन मोठ्या आणि पावरफुल बॅटरीसह बाजारात आणला आहे. Infinix Hot 10S स्मार्टफोनमध्ये 6,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह येते. फास्ट चार्जिंग सोबतच हा फोन पावर मॅरेथॉन टेक इम्बेडेड पण आहे.

Infinix Hot 10S ची किंमत व सेल

इनफिनिक्स हॉट 10एस च्या विक्रीसाठी कंपनीने शॉपिंग साइट फ्लिपकार्टची निवड केली आहे. Infinix Hot 10S चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 च्या किंमतीत बाजारात आला आहे. अश्याप्रकारे फोनच्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 27 मेपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल जो Heart of Ocean, Morandi Green, 7-Degree Purple आणि 95-Degree Black कलरमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here