Redmi 12C 30 मार्चला होईल भारतात लाँच, किंमत असू शकते 8 हजारांपेक्षा कमी

Highlights

  • Redmi 12C स्मार्टफोन 30 मार्चला भारतात लाँच होईल.
  • हा फोन चायनामध्ये आधी आला आहे.
  • रेडमी 12सी लो बजेट सेग्मेंटमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

रेडमी ब्रँड अंतगर्त काही दिवसांपूर्वी चीनमध्ये Redmi 12C स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता जो आता भारतात येत आहे. कंपनीनं अधिकृत घोषणा करून सांगितलं आहे की येत्या 30 मार्चला रेडमी 12सी भारतात लाँच केला जाईल. हा एक लो बजेट मोबाइल फोन आहे जो 50MP Camera, MediaTek Helio G85 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो. Redmi 12C 8 हजारांच्या बजेटमध्ये भारतात एंट्री करू शकतो.

रेडमी 12सी मेमरी व्हेरिएंट्स व प्राइस

Redmi 12C चीनमध्ये तीन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला होता. यात 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज, 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजचा समावेश होता. भारतात देखील हेच व्हेरिएंट्स येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे चीनमध्ये या फोनची प्रारंभिक किंमत 699 युआन म्हणजे 8,300 रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे रेडमी 12सी ची भारतातील किंमत 8 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवली जाऊ शकते. हे देखील वाचा: 6,000mAh च्या राक्षसी बॅटरीसह Samsung Galaxy F14 5G ची एंट्री; किंमत 12,990 रुपये

रेडमी 12सी चे चीनमधील स्पेसिफिकेशन्स

  • 6.71 इंचाचा डिस्प्ले
  • 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज
  • मीडियाटेक हीलियो जी85
  • 50एमपी ड्युअल कॅमेरा
  • 10वॉट 5,000एमएएच बॅटरी

Redmi 12C बद्दल चर्चा आहे की हा स्मार्टफोन त्याच फीचर्स व स्पेसिफिकेशन्ससह भारतात लाँच होऊ शकतो जे चीनमध्ये देण्यात आले होते. चायनामध्ये हा फोन 20.6:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनलेल्या 1650 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.71 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन स्क्रीन 500निट्स ब्राइटनेस आणि 1500:1 कॉन्ट्रास्ट रेशियोवर काम करते.

रेडमी 12सी अँड्रॉइड अँड्रॉइड ओएसवर सादर करण्यात आला आहे जो मीयुआय 13 सह चालतो. या मोबाइल फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी85 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी हा फोन माली-जी52 एमपी2 जीपीयूला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन LPDDR4X RAM + eMMC 5.1 ROM वर चालतो. हे देखील वाचा: 13 एप्रिलला भारतात लाँच होईल पावरफुल गेमिंग फोन Asus ROG Phone 7

Redmi 12C फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तसेच सेकंडरी एआय लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोनमध्ये 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here