लवकरच येऊ शकतो Redmi A2 स्मार्टफोन; NBTC वेबसाइटवर झाला लिस्ट

Highlights

  • लवकरच Redmi A1 चा अपग्रेड व्हर्जन Redmi A2 येत आहे
  • स्मार्टफोनला NBTC सर्टिफिकेशन मिळालं.
  • मॉडेल नंबर 23028RN4DG सह Redmi A2 लिस्ट झाला.

मोबाइल निर्माता Redmi भारतीय युजर्ससाठी आपल्या A-Series चा विस्तार करणार आहे. बातमी आली आहे की एक नवीन स्मार्टफोन Redmi A2 नावानं लवकरच सादर होऊ शकतो. गेल्यावर्षी 2022 मध्ये कंपनीनं Redmi A1 स्मार्टफोन सादर केला होता. आता कंपनी याचा अपग्रेड व्हर्जन A2 घेऊन येत आहे. नवीन Redmi A2 स्मार्टफोनचे काही लीक आणि रेंडर्स देखील समोर आले आहेत. त्याचबरोबर हा स्मार्टफोन आता NBTC सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे.

NBTC वेबसाइटवर Redmi A2

एनबीटीसी सर्टिफिकेशन वेबसाइटवर रेडमीचा नवीन डिवाइस 23028RN4DG मॉडेल नंबरसह दिसला आहे. डिवाइसचं देखील पण रेडमी ए2 दिसत आहे. परंतु सध्या मॉडेल नंबर आणि मोबाइलच्या नावाव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती मिळाली नाही. परंतु जुन्या लीकमध्ये सांगण्यात आलं होतं की या डिवाइसमध्ये 6.52 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळेल. ज्यात 1600 x 720 चं पिक्सल रिजॉल्यूशन देण्यात येईल. डिवाइसमध्ये डिस्प्लेवर वॉटर ड्रॉप नॉच डिजाइन देखील मिळेल. हे देखील वाचा: Redmi 12C येतोय भारतात; लाँचपूर्वीच सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झाला फोन

Redmi A2 चे संभाव्य स्पेसिफिकेशन

Redmi A2 डिवाइसचे फीचर्स आणि स्पेक्स लिक्समधून समोर आले आहेत. त्यानुसार या फोनमध्ये Helio G36 प्रोसेसर देण्यात येईल, जोडीला 2जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील मिळेल, ज्याच्या मदतीनं 512 जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येईल. डिवाइसमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी 10W चार्जिंग सपोर्टसह दिली जाईल.

लीकनुसार Redmi A2 स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 8 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच, फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 गो एडिशनवर चालेल. हे देखील वाचा: OnePlus Ace 2V मध्ये मिळणार 5000mAh ची बॅटरी आणि आयआर ब्लास्टर; कंपनीनं दिली माहिती

कनेक्टिव्हिटीसाठी Redmi A2 स्मार्टफोनमध्ये 2.4GHz, ब्लूटूथ v5.0, ड्युअल सिम आणि मायक्रो यूएसबी पोर्ट सारखे ऑप्शन मिळतील. हा डिवाइस युरोपमध्ये ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन जैसे तीन ऑप्शनमध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच फोनची किंमत EUR 97 म्हणजे सुमारे 8,600 रुपये असू शकते. सर्टिफिकेशन साईटवरील लिस्टिंगवरून अंदाज लावला जात आहे की कंपनी काही आठवड्यांमध्ये हा डिवाइस लाँच करू शकते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here