Redmi Note 12R बनू शकतो जगातील पहिला Snapdragon 4 Gen 2 असलेला फोन, 30 जूनला होऊ शकतो लाँच

Highlights

  • फोन 23076RA4BC मॉडेल नंबरसह लिस्ट
  • Redmi Note 12R 30 जूनला ऑफिशियल केला जाऊ शकतो
  • हा रेडमी फोन Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरसह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो.

Xiaomi नं काही महिन्यांपूर्वी चीनमध्ये Redmi Note 12R Pro स्मार्टफोन लाँच केला होता ज्याची किंमत जवळपास 20,500 रुपयांपासून सुरु होते. आता बातमी येत आहे की कंपनी ह्या मोबाइलच्या वॅनिला मॉडेल Redmi Note 12R वर देखील काम करत आहे जो 30 जूनला लाँच होऊ शकतो. हा रेडमी फोन Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरसह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो.

जगातील पहिला Snapdragon 4 Gen 2 असलेला फोन

Redmi Note 12R संबंधित माहिती चायना टेलीकॉम वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे जिथे फोन 23076RA4BC मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे. इथे फोनमध्ये ‘SM4450’ चिपसेट असल्याचं सांगण्यात आलं आहे जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 असू शकतो. आतापर्यंत कोणत्याही फोनमध्ये हा प्रोसेसर देण्यात आला नाही आणि रेडमी नोट 12आर ह्या चिपसेटसह लाँच होणारा पहिला फोन असू शकतो.

रेडमी नोट 12आर लाँच डिटेल

टेक रिपोर्ट्सनुसार शाओमी सब-ब्रँड रेडमी आपला हा नवीन फोन ह्या महिन्यात मार्केटमध्ये येऊ शकतो. रिपोर्टनुसार, Redmi Note 12R 30 जूनला ऑफिशियल केला जाऊ शकतो जो सर्वप्रथम चीनमध्ये लाँच होईल. हा स्मार्टफोन भारतीय बाजारात एंट्री करेल की नाही हे मात्र स्पष्ट झालं नाही.

रेडमी नोट 12आर स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 6.79” FHD+ display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 50MP Rear Camera
  • 5,000mAh Battery

  • स्क्रीन : लीकनुसार हा नवीन रेडमी फोन 6.79 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाईल. ही पंच-होल स्क्रीन असू शकते ज्यात 90हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळू शकतो.
  • प्रोसेसर : प्रोसेसिंगसाठी ह्या रेडमी नोट 12आर मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर असू शकतो.
  • मेमरी : रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन 8जीबी पर्यंतच्या रॅमला सपोर्ट करेल जोडीला 256जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ह्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलच्या सेकंडरी लेन्सचा समावेश केला जाऊ शकतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी Redmi Note 12R मध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाईल असं लीकमध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here