Samsung Galaxy A91 चे फुल स्पेसिफिकेशन्स लीक, 8 जीबी रॅम आणि एंडरॉयड 10 सह असेल 45w 4500mAh बॅटरी

Samsung बद्दल अलीकडेच एक बातमी समोर आली होती ज्यात सांगण्यात आले होते कि कंपनीच्या ‘गॅलेक्सी ए सीरीज’ चे दोन आगामी स्मार्टफोन्स Galaxy A71 आणि Galaxy A51 इंडियन सर्टिफिकेशन्स साइट ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) वर लिस्ट करण्यात आले आहेत. या लिस्टिंगवरून स्पष्ट झाले आहे कि गॅलेक्सी सीरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात येतील. आज या सीरीजच्या अजून एका स्मार्टफोन Samsung Galaxy A91 चे पण फुल स्पेसिफिकेशन्स इंटरनेट वर लीक झाले आहेत.

Samsung Galaxy A91 संबंधित महत्वाची माहिती सॅममोबाईल ने आपल्या रिपोर्ट मध्ये प्रकाशित केली आहे. सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार सॅममोबाईल ने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे कि गॅलेक्सी ए सीरीजचा हा स्मार्टफोन सॅमसंग यावर्षी नाही तर साल 2020 मध्ये आयोजित होणाऱ्या सॅमसंग ईवेंट मध्ये Samsung Galaxy A91 टेक मंचावर आणेल. या रिपोर्ट मध्ये Galaxy A91 मॉडेल नंबर SM-A915F सांगण्यात आला आहे.

Samsung Galaxy A91

रिपोर्टनुसार Galaxy A91 सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजच्या Galaxy A90 स्मार्टफोनच्या तुलनेत खूप एडवांस आणि पावरफुल असेल. स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता वेबसाइटने सांगितले आहे कि हा डिवाईस 6.7 इंचाच्या फुलएचडी+ इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. रिपोर्ट पाहता Samsung Galaxy A91 मध्ये Galaxy S10 प्रमाणे पंच होल डिस्प्ले मिळणार नाही. Samsung Galaxy A91 या रिपोर्ट मध्ये 8 जीबी च्या पावरफुल रॅम सह दाखवण्यात आला आहे. या फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते जी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते. रिपोर्टनुसार Galaxy A91 एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 सह सादर केला जाईल तसेच प्रोसेसिंग साठी या डिवाईस मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट मिळेल.

Galaxy A90

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A91 क्वाड रियर कॅमेऱ्यासह येईल. रिपोर्टनुसार या फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर मिळेल जो ओआईएस फीचरसह येईल. हा फोन 8 मेगापिक्सल ते 12 मेगापिक्सल पर्यंतच्या वाइड अँगल लेंसला सपोर्ट करू शकतो. त्याचबरोबर फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर दिला जाऊ शकतो. सेल्फी साठी Samsung Galaxy A91 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.

Samsung Galaxy A91 मध्ये रिपोर्टनुसार ब्लूटूथ 5.0 आणि वाईफाई आहे. तसेच फोन मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 4500एमएएच ची बॅटरी असू शकते. रिपोर्टनुसार Galaxy A91 ची बॅटरी 45वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Samsung Galaxy A91 चे स्पेसिफिकेशन्स तोपर्यंत ठोस म्हणता येणार नाहीत जोपर्यंत Samsung अधिकृत घोषणा करत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here