जियोचा 4जी स्पीड झाला कमी तरीही आहे नंबर 1, बघा कोण आहे नंबर 2,3 आणि 4

टेलीकॉम रेग्यूलेट्री अथॉरिटी आॅफ इंडिया ने भारतातील 4जी स्पीड चा डाटा सादर केला आहे. मागच्या अनेक महिन्यानप्रमाणे यावेळी पण रिलायंस जियो ने बाजी मारली आहे. पण यूजर्स साठी विचार करण्याची बाब म्हणजे जियो चा 4जी स्पीड यावेळी थोडा कमी झाला आहे. ट्राई ने हा डाटा मायस्पीड अॅप च्या माध्यमातून सादर केला आहे. ज्या वर आधारित भारतातील सर्व आॅपरेटर्स च्या 4जी स्पीड ची माहिती देण्यात आली आहे.

ट्राई ने दिलेल्या माहितीनुसार जियो चा 4जी डाउनलोड स्पीड यावर्षी एप्रिल मध्ये 14.7 एमबीपीएस होता तर मार्च मध्ये जियो चा डाउनलोड स्पीड 17.9 एमबीपीएस होता. तसेच दुसर्‍या नंबर वरील एयरटेल जी जियो पेक्षा खुप मागे आहे. कंपनी ने फक्त 9.2 एमबीपीएस इतका स्पीड दिला. तर तिसर्‍या नंबर वर 7.4 एमबीपीएस 4जी स्पीड सह आयडिया ने आपली जागा बनवली आहे आणि वोडाफोन फक्त 7.1 एमबीपीएस स्पीड मुळे शेवटच्या स्थानावर आहे.

अपलोड स्पीड पाहता आयडिया ने बाजी मारली आहे. कंपनी ने 4जी अपलोड स्पीड मध्ये 6.5 एमबीपीएस अपलोड स्पीड देऊन पहिला नंबर मिळवला आहे तर 5.2 एमबीपीएस च्या अपलोड स्पीड सह वोडाफोन दुसर्‍या स्थानावर आहे. रिलायंस जियो चा 4जी अपलोड स्पीड 4 एमबीपीएस आहे. तर 3.7 एमबीपीएस सह एयरटेल चौथ्या नंबर वर आहे.

काही महिन्यांपूर्वी ओपेन सिग्नल चा रिपोर्ट आला होता ज्यात एयरटेलला सर्वात वेगवान 4जी स्पीड वाला नेटवर्क घोषित करण्यात आले होते. या रिपोर्ट मध्ये जियो ला सर्वात शेवटचे स्थान मिळाले होते. पण हे मात्र नमूद करण्यात आले होते की कवरेज मध्ये जियो नंबर एक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here